अंगणवाडी केंद्रातील 109 जणांना पुरस्कार 

 109 people Award Anganwadi Centers
109 people Award Anganwadi Centers

ओरोस (सिंधुदुर्ग) - एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्हा परिषद अंगणवाडी केंद्रातील कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य सेविकांना 2020-21 या आर्थिक वर्षातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. महिला व बाल कल्याण समिती सभापती माधुरी बांदेकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले.

3 मुख्य सेविका, प्रत्येकी 49 अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आठ मिनी अंगणवाडी सेविका अशा 109 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. उद्या (ता.20) सकाळी 11 वाजता नवीन डीपीडीसी सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती बांदेकर यांनी दिली. 
सभापती बांदेकर यांनी आपल्या दालनात आज याबाबत सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी महिला व बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सभापती म्हणाल्या, ""जिल्ह्यात 49 अंगणवाडी बीट आहेत. प्रत्येक बीटमध्ये एक अंगणवाडी सेविका व एक मदतनीस यांची निवड केली आहे. आठ तालुक्‍यातून आठ याप्रमाणे मिनी अंगणवाडी सेविकांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. जिल्ह्यातील तीन मुख्य सेविकांची निवड झाली आहे. या पुरस्कारांचे वितरण उद्या (ता.20) सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन डीपीडीसी सभागृहात केले जाणार आहे. 

जिल्ह्यातून तीन अंगणवाडी मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका 49, मदतनीस 49 तर मिनी अंगणवाडी सेविका 8, अशा एकूण 109 कर्मचाऱ्यांना "आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार' यंदा देण्यात येणार आहे. यामध्ये आदर्श मुख्यसेविका- सांगेल नं.2 - संचिता कुडाळकर (सावंतवाडी), माणगाव नं.1-सारा गायकवाड (कुडाळ), आचरा नं.1- क्षमा प्रभुदेसाई (मालवण). 
आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पुरस्कार.

देवगड-बापर्डे कवठाळवाडी-दिक्षा गोळवणकर (सेविका), शुभांगी येजरकर, (मदतनीस), तिर्लोट मोहुळ-मेहरून्नीसा भाटकर (सेविका), सायली तिर्लोटकर (मदतनीस), गिर्ये पुजारेवाडी-सरोज फाळके (सेविका), प्रियांका वारीक (मदतनीस), दाभोळे राऊतवाडी-स्मिता गवस (सेविका), प्रतिभा तेली (मदतनीस), कुवळे-शैलेजा सावंत (सेविका), माया लाड (मदतनीस), वेळगिवे गावठण-श्रेया चव्हाण (सेविका), संगिता लाड (मदतनीस), कुणकेश्‍वर चांदेलवाडी-शरयु हिर्लेकर (सेविका), सरिता कुणकेश्‍वरकर (मदतनीस), वैभववाडी-आचिर्णे मधलीवाडी-सुप्रिया रावराणे (सेविका), सारिका प्रभू (मदतनीस), करूळ गावठण ब-गौरी कोळसूकर (सेविका), कल्पना वळंजू (मदतनीस), आखवणे भोम-वैशाली कदम (सेविका), मानसी कांबळे (मदतनीस), कणकवली-सांगवे केळीचीवाडी-स्नेहल सावंत (सेविका), क्षमा सावंत (मदतनीस), जानवली वाकाडवाडी-माधुरी लाड (सेविका), संचिता सावंत (मदतनीस), कळसुली भोगनाथ-वैष्णवी सावंत (सेविका),

सुचिता घाडीगांवकर (मदतनीस), नांदगांव तिठा-लता डामरे (सेविका), गिता बिड्ये (मदतनीस), लोरे गुरववाडी-प्रियांका सावंत (सेविका), सिताबाई जाधव (मदतनीस), खारेपाटण रामेश्‍वरनगर-प्रतिक्षा ढेकणे (सेविका), जयश्री पिसे (मदतनीस), दारूम नं.1-अस्मिता तळेकर (सेविका), समिधा कर्ले (मदतनीस), नागवे नं.1-शिल्पा सावंत (सेविका), रेश्‍मा सुतार (मदतनीस), मालवण-बांदिवडे पालयेवाडी-प्रियांका सावंत (सेविका), रिया माळकर (मदतनीस), सुकळवाड-संजना कुशे (सेविका), वंदना वायंगणकर (मदतनीस), राठिवडे गावठण-सुजाता पुजारे (सेविका), रोहिणी मेस्त्री (मदतनीस), आंबेरी वाक-वनिता मुसळे (सेविका), मंजिरी परब (मदतनीस), चौके कुळकरवाडी-सुचिता पोळ (सेविका), सुहासिनी परब (मदतनीस), मसुरे आंगणवाडी-रूचिता आंगणे (सेविका), शितल आंगणे (मदतनीस), रेवंडी मधली-रिया कांबळी (सेविका), अस्मिता कांबळी (मदतनीस), आचरा हिर्लेवाडी-काजल गांवकर (सेविका),

सुरेखा तांडेल (मदतनीस), कुडाळ-झाराप कुंभारवाडी-विद्या आंबेकर (सेविका), रूपाली पेंडुरकर (मदतनीस), माणगांव बेनगांव-शोभा वारंग (सेविका), रेश्‍मा भोई (मदतनीस), गोठोस मांजरदोरा-सुहासीनी लाड (सेविका), स्मिता परब (मदतनीस), बांबुळी-अमिता पेडणेकर (सेविका), नकुबाई देवरूखकर (मदतनीस), माड्याचीवाडी रायगांव-दिप्ती परब (सेविका), सुरेखा राणे (मदतनीस), आंब्रड बाजारपेठ-शर्मिला साळसकर (सेविका), सुलोचना मुळीक (मदतनीस), वाडीवरवडे ग्रामपंचायत-रती मोहिते (सेविका), सुलोचना परब (मदतनीस), जांभवडे भूतवड-सावित्री पालव (सेविका), शिल्पा वर्देकर (मदतनीस), वेंगुर्ले-वेळागर टाक-मेघा मयेकर (सेविका), शोभा कासकर (मदतनीस), आडेली देऊळवाडी-माधवी ठाकूर (सेविका), प्रणाली धर्णे (मदतनीस), म्हापण चव्हाणवाडी-मानसी चव्हाण (सेविका), नम्रता चव्हाण (मदतनीस), पाल कुलदेव-रेणुका कांबळे (सेविका), स्वाती परब (मदतनीस),

कारीवडे भैरववाडी-नलीनी दळवी (सेविका), मनिषा परब (मदतनीस), सावंतवाडी-चराटे टेंबवाडी-स्वरदा देसाई (सेविका), रूक्‍मीनी परब (मदतनीस), निरवडे बांदिवडेकरवाडी-गायत्री कांदळगावकर (सेविका), सुमित्रा बांदिवडेकर (मदतनीस), सोनुर्ली गावठण-मिनाक्षी गावकर (सेविका), प्रमिला कुडतरकर (मदतनीस), इन्सुली सावंतटेंब-नेहा देसाई (सेविका), उमा भिसे (मदतनीस), डिंगणे गाळेल आंबेकरवाडी-नयना नाईक (सेविका), शितल नाईक (मदतनीस), देवसु प्राथमिक शाळा-गीता गावडे (सेविका), अश्‍विनी सावंत (मदतनीस), मळेवाड भटवाडी शाळा नं.3-समिक्षा नाईक (सेविका), स्वराली शिरोडकर (मदतनीस), दोडामार्ग-वझरे गावठण-वंदना गावडे (सेविका), सुरेखा गवस (मदतनीस), पणतुर्ली-अंजनी गवस (सेविका), अमिता राणे (मदतनीस), कोनाळ तिराळीवाडी-सत्वशिला गवस (सेविका), प्रिती शेट्ये (मदतनीस). 

आदर्श अंगणवाडी मिनी सेविका 
देवगड-जामसंडे बेलवाडी-कल्याणी अदम, वैभववाडी-कुर्ली गावठण-मनिषा पाटील, कणकवली-तोंडवली गावठण-प्रेरणा नाडकर्णी, मालवण-चिंदर देऊळवाडी-मनवा चिंदरकर, कुडाळ-कुंदे आईनमळा-सायली परब, वेंगुर्ले-परवाडा कणकेवाडी-समिक्षा मळगावकर, सावंतवाडी-सांगेली खालचीवाडी-स्नेहा सावंत, दोडामार्ग-साटेली भेडशी भोमवाडी-संजना धर्णे यांना "आदर्श अंगणवाडी मिनी सेविका पुरस्कार' जाहीर झाले आहेत.  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com