रायगड - रसायनी येथे पक्ष्यांना अनुकूल वातावरण, संख्या वाढली
रसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा, आणि परिसरात बारा माहिने चालणारा शेती व्यवसाय आदि कारणांमुळे पक्षांना परिसरात अनुकूल वातावरण असल्याने पक्षांची संख्या भरपूर वाढत आहे. मोहोपाडा येथील एचओसी कॉलनीतील श्री साई बाबा मंदिरा जवळील मोठमोठी झाडे पक्षांचे वस्तीस्थान बनले आहे.

परिसरात बारा महिने शेती व्यावसाय चालतो त्यामुळे शेतात तसेच नदीच्या किनारी आणि झाडांवर पक्षांना भक्ष्य भेटते त्यामुळे पक्षांना वास्तव्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने राज्यात आढळणाऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे. तसेच परदेशी पाहुण्या पक्षांचा ओघ सुद्धा वाढताना दिसत आहे. पक्षांना हा परीसर एक प्रकारे नंदनवण आहे. असे सांगण्यात आले.
कावळे, पारवे, पोपट, पानकावळे, चिमण्या, सांळुख्या, बगळे, चिरक, कबूतर आदि राज्यांतील पक्षी परीसरात आढळतात. तसेच हळदया, काळया शराटी, हिरवे कबुतर, तांबट खाटकी, स्वर्गीय नरतक, निलपंख, काळा खंडया, आदि स्थलांतरीत पक्षी आढळतात. हवामान बदालानुसार हे पक्षी परिसरात येतात. पुन्हा परत जातात असे शेतकऱ्यांनी सांगितले.
"परिसरात पाताळगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. तसेच ठिक ठिकानी असलेली भरपूर झाडे आहे. त्याचबरोबर कर्नाळा किल्ल्याच्या डोंगर रागांचा जंगलाचा बरासा भाग रसायनीला लागुन आहे. तसेच कर्नाळा किल्ल्यांच्या पायथ्याशी उसरण धरण आहे. हे सर्व वातावरण पक्षांना अनुकल आहे."
- विनायक डुकरे,
पक्षीप्रेमी, मोहोपाडा रसायनी