रत्नागिरीकरांना दिलासा ; बाधितांच्या तुलनेत तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त

राजेश कळंबटे
Friday, 25 September 2020

गेले काही दिवस सहा ते सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत असल्यामुळे मृत्यूदर वाढत होता

रत्नागिरी - सात दिवसानंतर जिल्ह्यात चोविस तासात कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार झाला आहे. 116 बाधित सापडल्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सात हजाराच्या पुढे गेला आहे. तीन मृत रुग्णांची नोंद झाल्याने एकूण मृतांची संख्या 240 झाली. बाधितांपेक्षा तिप्पट म्हणजेच 374 रुग्ण एका दिवसात कोरोनामुक्त होऊन घरी परतले, ही रत्नागिरीकरांसाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.

जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी चोविस तासात दीडशे ते दोनशे रुग्ण मिळत होते. 19 सप्टेंबरपासून ही संख्या घटली. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 116 पैकी आरटीपीसीआरमध्ये 82 तर अ‍ॅण्टीजेनमध्ये 34 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीत 34 तर चिपळुणात 27 आहेत. मंडणगडमध्ये एकही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. दापोली 2, खेड 16, गुहागर 11, संगमेश्‍वर 11, लांजा 13, राजापूर 2 रुग्ण बाधित आले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सुरू झालेल्या घरोघरी तपासणीमुळे बाधितांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा 7 हजार 70 झाला.

गेले काही दिवस सहा ते सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत असल्यामुळे मृत्यूदर वाढत होता. पण शुक्रवारच्या अहवालात तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यातील चिपळूणमधील दोन रुग्णांचा मृत्यू 11, 12 सप्टेंबरला झाला होता. त्यांची नोंद उशिराने झाली आहे. शुक्रवारी एकमेव रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बाधितांचा आकडा शंभरवर पोचला असला तरीही कोरोनावर मात करून बाहेर पडणार्‍यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 374 रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. एकूण बरे झालेल्यांची संख्या 5,712 झाली. बरे होणार्‍यांचा टक्का 80.79 आहे. जिल्ह्यात 961 रुग्ण विविध ठिकाणी उपचाराखाली आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील एकूण बाधितांमध्ये शहरी भागातील अधिक रुग्ण आहेत. त्यात आरोग्य मंदिर 1, नाचणे गोडाऊन 1, साळवी स्टॉप 2, पंधरामाड मिर्‍या 1, नॅनो सिटी 1, परटवणे 2, जि प क्वार्टर्स 1, शांतीनगर 1, खेडशी 1, जयगड 1, पर्‍याची आळी 1, शांतीनगर 1, काँग्रेस भुवन 2, आडवली 1, सोमेश्वर 2, जाकीमिर्‍या 1, गयाळवाडी 1, खडपेवठार 1, टीआरपी 1, कर्ला 1, सडामिर्‍या 1, नाचणे 2 आणि अन्य एक असे रुग्ण सापडले आहेत.

हे पण वाचा मी ठरवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही भेटू शकतो, पण... ; खासदार संभाजीराजे

 एकूण बाधित                7,070
आजचे बाधित                 116
 एकूण निगेटीव्ह            34,901
आजचे निगेटीव्ह               320
बरे झालेल्यांची संख्या     5,712
मृतांची संख्या       


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 116 new corona cases in ratnagiri