‘मागेल त्याला तळे’चे १२ प्रस्ताव दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

राजापूर - पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतीच्या हंगामामध्ये पावसाअभावी पाणीटंचाई होऊन दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होते. या स्थितीवर मात करण्यासाठी शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ‘मागेल त्याला तळे’ ही योजना कार्यान्वित केली असून ही योजना शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामातील दुष्काळाच्या स्थितीमध्ये वरदायिनी ठरणारी आहे. 

या योजनेसाठी तालुक्‍यातून सुमारे बारा जणांचे प्रस्ताव आले असून ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी तातडीने तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांनी केले आहे. 

शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना स्वतची सिंचन सुविधा असावी, म्हणून मागेल त्याला शेततळे ही योजना कार्यान्वित केली आहे. कोकणातील शेतीही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. शेतीच्या ऐन हंगामामध्ये पावसाने दांडी मारल्यास कोकणातील शेतकऱ्यांचे या कालावधीमध्ये पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल होतात. या साऱ्या स्थितीवर मात करताना पावसाळ्यामध्ये शेतीच्या हंगामामध्ये स्वतःची सिंचन क्षमता उभारण्याच्या दृष्टीने मागेल त्याला शेततळे ही योजना कोकणातील शेतकऱ्यांसाठी चांगलीच फलदायी ठरणार आहे. वैयक्तिक लाभाची असलेल्या या योजनेमध्ये शेततळ्याचे आकारमान त्यामध्ये होणारा संभाव्य पाणीसाठा, पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यासाठ्याच्या अनुषंगाने ठेवण्यात आले आहे. यामध्ये शेततळ्यांचे इनलेट आणि आऊटलेटविरहित शेततळे असे दोन भाग आहेत. या शेततळ्यांसाठी कमीत कमी ४४१ घनमीटर होणाऱ्या खोदकामासाठी २९ हजार ७०६ रुपयांपासून २ हजार १९६ घनमीटर खोदकामासाठी ५० हजार इतके अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. शेतीच्या हंगागामध्ये ही शेततळ्याची योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदायिनी ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी तालुका कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. मेश्राम यांनी केले आहे.

Web Title: 12 proposal for lake

टॅग्स