सावंतवाडीत 39 जातींचे 135 पक्षी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सावंतवाडी - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री आयोजित कॉमन बर्ड मॉनिटरिंग अंतर्गत आयबीसीएनतर्फे वाईल्ड कोकण व येथील सिंधु निसर्ग पर्यावरण प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राममध्ये शहरामधील पक्षी गणना झाली. यामध्ये 39 जातींचे 135 पक्षी आढळून आले. 

सावंतवाडी - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री आयोजित कॉमन बर्ड मॉनिटरिंग अंतर्गत आयबीसीएनतर्फे वाईल्ड कोकण व येथील सिंधु निसर्ग पर्यावरण प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राममध्ये शहरामधील पक्षी गणना झाली. यामध्ये 39 जातींचे 135 पक्षी आढळून आले. 

येथे भरलेल्या पक्षीमित्र संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर पूर्वतयारीसाठी असलेल्या तसेच पक्षीतज्ज्ञ नंदकिशोर दुधे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार गेले वर्षभर शहरात पक्षी गणना करण्यात येत आहे. दर तीन महिन्यांनंतर एकदा याप्रमाणे चार वेळा ही गणना करण्यात येत आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोनशे मीटरप्रमाणे दोनशे मीटर अंतराचे दहा भाग करून प्रत्येक भागात कोणकोणते पक्षी आढळतात याची गणना करण्यात आली. मोती तलावाशेजारी असलेल्या मॅंगो 2 हॉटेलपासून पक्षी गणनेला सुरवात झाली. कृषी विभागाच्या कार्यालयासमोरून, नरेंद्र टेकडीवरील हनुमान मंदिराच्या दोन किलोमीटरपर्यंतच्या अंतरात ही गणना करण्यात आली. यामध्ये स्वर्गीय नर्तक, भारद्वाज, यलो टीट, बुलबुल, ऑरेंज हेडेड, पांढऱ्या पोटाचा धीवर, कोकिळा सुतार पक्षी अशा प्रकारचे 39 जातींचे एकूण 135 पक्षी आढळले. या वेळी वन विभागाचे सुभाष पुराणिक, वाईल्ड कोकणचे गणेश मर्गज, धीरेंद्र होळीकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी महेश पटेकर, अभिमन्यू लोंढे, जयदीप पडवळ, जगन्नाथ सकपाळ यांच्यासोबत गौरी बर्वे, जयंती झोरे, राधा बर्वे, नगमा आगा, अश्‍विनी जोशी, अंकिता परब, अक्षता तेली, एकता जाधव, सोनल गवस, जान्हवी पास्ते, ऋचा कशाळीकर, प्रियंका कांबळे, उल्का आजगावकर, उमाली कारिवडेकर, निकिता धुरी, ओंकार आयरेकर, शुभम पुराणिक, मिहिर राणे आदी विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

Web Title: 135 birds of 39 species Sawantwadi