14 corona positive case found in ratnagiri
14 corona positive case found in ratnagiri

ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी चाैदा जणांना कोरोनाची लागण

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना बाधित मृताची संख्या पाचवर पोचली असून पॉझिटिव्ह रुग्णातही भर पडली आहे. सायंकाळी चिपळूणमधील 6 आणि राजापूर तालुक्यातील 8 जणांचे नमुने पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे  कोरोना रुग्णांची संख्या 175 झाली आहे.

मिरज येथून सायंकाळी आलेल्या 17 अहवालामध्ये कामथे येथील 6 तर राजापूर येथील 8 रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 175 वर पोचली आहे. उर्वरित तीन अहवाल निगेटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

कामथे येथील पॉजिटीव्ह रुग्ण चिपळूण तालुक्यातील आहेत. ते 
सर्व धामेली गावचे असून मुंबई अंधेरी येथे मृत्यू झालेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आले होते. गावी आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे स्वॅब घेऊन सावर्डे वहाळफाटा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

 राजापूरला दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या वडदहसोळ आणि कशेळी येथील त्या कुटुंबातील आणखीन तिघेजनासह एकाच दिवशी तब्बल आठजण कोरोना रुग्ण सापडले आहेत. विखारे गोठणे,  कशेळी, वडदहसोळ पाठोपाठ आता ओनी आणि प्रिंदावन अशा नवीन दोन गावांमध्ये रुग्ण आहेत. त्यात प्रिंदावनमध्ये तब्बल चार रुग्ण आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये कोरोनाबाधीत रूग्ण आढळलेले असताना राजापूर तालुका मात्र सेफ झोनमध्ये होता. अशातच मागील काही दिवसांपासून तालुक्यात मुंबईकर चाकरमानी दाखल होऊ लागल्याने तालुक्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये विखारे गोठणे येथे एक, कशेळी आणि वडदहसोळं येथे प्रत्येकी दोन असे पाच रुग्ण आढळले होते. त्यानंतर, गेले दोन तीन दिवस तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.  राजापूर तालुक्यामध्ये तब्बल आठ कोरोनो पोजेटीव्ह रुग्ण सापडले आहेत. वदडहसोळ येथील ज्या कुटुंबातील यापूर्वी दोन कोरोनो कशेळीमधील त्या कुटुंबातील आणखीन एका रुग्णाची भर पडली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या उपचाराखली असलेल्या रुग्णांची संख्या 103 आहे. आतापर्यंत 67 जणं बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्यात मंगळवारी दापोलीतील 9 आणि संगमेश्‍वरमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. 

मुंबई येथून 18 मे रोजी आलेल्या एका रुग्णाचा (वय 61 पुरुष) आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला 19 मे 2020 रोजी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाशी निगडीत आजाराची लक्षणे आढळल्यामुळे अधिक उपचारंासाठी रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. 19 मे रोजी त्यांचे स्वॅब घेण्यात आला होते. 21 मे रोजी हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्या रुग्णास अर्धांगवायूचाही त्रास होता. गेले आठ दिवस ते कोरोनाशी झुंज देत होते. आज सकाळी 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांची संख्या पाच वर पोचली असून संगमेश्वर तालुक्यातील हा पहिला बळी आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित रुग्ण 161 असून त्यातील 101 रुग्ण उपचार घेत आहेत. बरे होणार्‍या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. आतापर्यंत 55 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. ही परिस्थिती असली तरीही मुंबईतून रत्नागिरीत येणार्‍या चाकरमान्यांची संख्या वाढतच आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत घरीच विलगीकरण केलेल्यांची संख्या 74 हजारापेक्षा अधिक आहे. ही संख्या पुढील आठ दिवसात वाढण्याची शक्यता आहे. तसेच मिरजमध्ये 337 अहवाल प्रलंबित आहेत. त्यातील बहूतांश हे कंटेनमेंट झोनमधून आलेले असल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना बाधित रुग्णांचा संपर्क गावातील लोकांशी आल्यामुळे ती गावे विषाणू बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात रत्नागिरी तालुक्यातील नरबे, संगमेश्वर तालुक्यातील परचुरी, निवे बुद्रुक, मानसकोंड, वांझोळे, वाशी तर्फे देवरुख आणि पांगरी या गावांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी मिरज येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या 27 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात कामथेतील 12, रत्नागिरीतील 14 आणि राजापूर मधील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील 5,343 नमुने घेण्यात आले होते. त्यातील 175 रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 115 रुग्ण उपचार घेत आहेत. निगेटिव्ह अहवालांची संख्या 4,840 आहे.  67 रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत. घरीच विलगीकरणात ठेवलेल्यांची संख्या 81,727 असून संस्थात्मक विलगीकरणात 193 जणं आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com