चाैदाव्या शतकातील विष्णूमूर्ती सापडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

लांजा येथे मिळालेली विष्णूची मूर्ती १४ व्या शतकातील असावी, असे मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आशुतोष बापट यांनी सांगितले. अशा मूर्ती लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाला द्याव्यात.
-प्रकाश देशपांडे, कार्याध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर

चिपळूण - येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात १४ व्या शतकातील विष्णूची मूर्ती दाखल झाली. कांटे (ता. लांजा) येथे पुरातन लक्ष्मीकेशव मंदिर आहे. आठ वर्षापूर्वी मंदिरातील मूर्ती भंगली असल्याने नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. प्रथा आणि परंपरेप्रमाणे जुनी मूर्ती जलाशयात विसर्जित करण्यात आली होती. 

मंदिरातील जुन्या मूर्ती हा इतिहास असतो. या मूर्ती शिल्पावरून तिचा काळ समजतो. अशा अनेक मूर्ती आणि वस्तूंनी हे संग्रहालय समृद्ध आहे. मात्र, दुर्दैवाने रूढी व परंपरा सांगत अशा मूर्ती विसर्जित करून आपण तो इतिहास काळाआड करत आहोत. इतिहासाचे भान विसरल्याने असे होते. अनेक मंदिरातील अशा इतिहाससाक्षी मूर्ती नदी सागरात विसावल्या आहेत. चिपळूणच्या संग्रहालयाची माहिती लोटिस्माचे कार्यवाह विनायक ओक यानी कांटे येथील अनिल धोंडये यांना दिली. धोंडये चिपळूणला प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी ग्रामस्थांच्या मान्यतेने नदीच्या डोहातून मूर्ती काढून संग्रहालयाला दिली.

लांजा येथे मिळालेली विष्णूची मूर्ती १४ व्या शतकातील असावी, असे मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आशुतोष बापट यांनी सांगितले. अशा मूर्ती लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाला द्याव्यात.
- प्रकाश देशपांडे,
कार्याध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर

Web Title: 14th century Vaishnu statue found in Lanja