esakal | Ratnagiri : दीड लाखांचा गांजा जप्त; संशयितांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दीड लाखांचा गांजा जप्त; संशयितांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील कुवारबाव येथील नाकाबंदी ठिकाणी शहर पोलिसांनी गांजा (अमंली पदार्थ) वाहतूक करणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या. तपासात तिन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने तिघानाही दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

अक्षय चंद्रकांत जिंगडे (वय २२), विनोद कार्ले (दोघेही रा. संगमनगर, सिद्धिविनायक सायजिंग, ईश्वरस्वामी मठ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व रुहान रियाज होडेकर (रा. भाट्ये, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (ता. ३०) पहाटे चारच्या सुमारास कुवारबाव येथील नाकाबंदी ठिकाणी केली. पहाटेच्या सुमारास संशयित अक्षय जिगडे याच्याकडील सॅकमध्ये खाकी प्लॅस्टीक टेपने पॅक केलेली चार पाकिटे मिळून आली.

त्यात गांजा मिळून आला. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राहूल घोरपडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध अमली पदार्थविरोधी गुन्हा दाखल केला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव करत आहेत. गुरुवारी संशयितांना न्यायालयात हजर केले असता, २ ऑक्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

वाहतूक कोल्हापूरहून रत्नागिरीकडे

दरम्यान, जप्त पाकिटांची तपासणी केली असता, हिरवट-काळपट रंगाचा उग्र वासाचा गांजा मिळून आला. १ लाख ४२ हजार रुपयांचा, ९ किलो ४६७ ग्रॅम वजनाचा गांजा कोल्हापूरहून रत्नागिरीकडे आणत होता. पोलिसांनी ५ हजाराच्या मोबाईलसह १ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात पोलिसांनी तीन संशयितांना गुरुवारी अटक केली असून अंमली पदार्थ गांजा कोठून आणला, रत्नागिरीत हा साठा कोणाकडे ठेण्यात येत होता, याचा कसोशिने पोलिस तपास करत आहेत.

loading image
go to top