रस्ते कामांना दीड हजार कोटींची गरज - अनंत गीते

चिपळूण - तालुक्‍यातील दहिवली येथील रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री अनंत गीते. शेजारी सदानंद चव्हाण, सचिन कदम व पदाधिकारी.
चिपळूण - तालुक्‍यातील दहिवली येथील रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री अनंत गीते. शेजारी सदानंद चव्हाण, सचिन कदम व पदाधिकारी.

चिपळूण - जिल्ह्यातील विकासकामांना शिवसेनेकडून निधीची कमतरता भासणार नाही. पालकमंत्री, पर्यावरणमंत्री यांच्यासह राज्य सरकार व आपल्या माध्यमातून विविध योजनांसाठी दापोली व गुहागर मतदारसंघासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला आहे. रस्ते कामांसाठी सुमारे दीड हजार कोटींची गरज आहे. हा विशेष निधी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे मत खासदार मंत्री अनंत गीते यांनी मंडणगड येथे व्यक्त केले.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते यांच्या उपस्थितीत चिपळूण, दापोली, मंडणगड तालुक्‍यातील विकासकामांचे भूमिपूजन झाले. दौऱ्यात मंडणगड तालुक्‍यातील चिंचाळी रस्ता, पन्हळी रस्ता, लोकरवण येथील रस्ता व सामाजिक सभागृह, आंबवणे रस्ता, उबंरशेत रस्ता, पेवे-गावठाण विहीर, दापोली तालुक्‍यातील केळशी वरचाडुंग रस्ता, मांदिवली सामाजिक सभागृह, लाडघर रस्ता, आसूद रस्ता, तुळशी रस्ता कामाचे भूमिपूजन केले. चिपळूण तालुक्‍यातील खरवते रस्ता, साकुर्डे रस्ता, कळंबट मुख्य रस्ता ते झिमणवाडी स्मशानभूमी रस्ता, बौद्धवाडी रस्ता, झिमणवाडी, राजापूरेवाडी स्मशानशेड, दहिवली पुनवतवाडी रस्ता, दहिवली ग्रामदेवता, मुकनाकवाडी, ओमळी-पवारवाडी, बौद्धवाडी ते तुरंबव रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 

जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी विशेष निधीची आवश्‍यकता आहे. युती सरकारच्या १९९५ ते ९९ कालावधीत कोकण विकास कार्यक्रमांतर्गत कोट्यवधीचा निधी मिळवला होता. त्यामुळे रस्ते कामासाठी विशेष निधी मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांसोबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे गीते यांनी मंडणगड तालुक्‍यातील लोकरवण येथे सांगितले. या वेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, युवा सेनेचे योगेश कदम, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, खेड सभापती अण्णा कदम, मंडणगड सभापती आदेश केणे, उपसभापती रामदास रेवाळे, दापोली सभापती सौ. दीप्ती निखार्गे, उपसभापती उन्मेश राजे, जिल्हा परिषद सदस्य भगवान घाडगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com