काजूला किलोला १५५ चा दर

तुषार सावंत : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

कणकवली - कडाक्‍याच्या थंडीनंतर प्रचंड प्रमाणात मोहरलेल्या काजूंना निसर्गाच्या बदलामुळे यंदा चांगलाच फटका बसला. हंगामाच्या सुरवातीलाच काजूचा दर किलोला १५० ते १५५ रुपयांपर्यंत अडकून पडला आहे. आजच्या आठवडा बाजारात काजूची आवक वाढली असली तरी समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी बागायतदार संकटात आहे. 

कणकवली - कडाक्‍याच्या थंडीनंतर प्रचंड प्रमाणात मोहरलेल्या काजूंना निसर्गाच्या बदलामुळे यंदा चांगलाच फटका बसला. हंगामाच्या सुरवातीलाच काजूचा दर किलोला १५० ते १५५ रुपयांपर्यंत अडकून पडला आहे. आजच्या आठवडा बाजारात काजूची आवक वाढली असली तरी समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी बागायतदार संकटात आहे. 

सिंधुदुर्गातील काजूच्या उत्पन्नातून मोठी आर्थिक उलाढाल होते. शेतकरी बागायतदारांना आपल्या वर्षाचा खर्च भागविण्यासाठी काजूला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असते. यंदा केंद्र शासनाने ४५ टक्के आयात शुल्क विदेश काजूच्या खारवलेल्या आणि भाजलेल्या गरांसाठी लागू केला.  देशांतर्गत काजू पिकाला संरक्षण मिळून शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु हंगामातील काजूच्या घाऊक खरेदीला सुरवात झाल्यानंतर गेल्या आठवड्यात १५० वरून आज किलोचा दर १५५ इतका आला होता. जिल्ह्यात दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला हा भाग वगळता उर्वरित भागातील काजूला फारसा दर मिळत नाही. यंदा १५५ ने काजू खरेदी करायला या आठवड्यात सुरवात झाली असली तरी कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक न झाल्याने दर निश्‍चित झालेला नाही. गतवर्षी काजूच्या प्रतवारीनुसार ११० रुपये दर मिळत होता. यंदा गरजू शेतकऱ्यांनी आपल्याकडे साठविलेला हळवा काजू बाजारातील घाऊक व्यावसायिकांना विकला आहे. 

जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेली काजूची उलाढाल यंदा आशादायी असेल असे चित्र आहे. आयात शुल्क वाढविल्याने विदेशी काजू फारसा खरेदी केला जाणार नाही. त्यामुळे कर्नाटक, केरळबरोबरच कोकणातील काजूला चांगली मागणी राहील. त्यामुळे १५० वरून १७५ रुपयांपर्यंत तरी किलोचा दर राहील, असे शेतकरी बागायतदारांना वाटत आहे. त्यामुळे गरजू वगळता मोठ्या उत्पादकांनी अजूनही बाजारात काजू विक्रीसाठी आणलेला नाही.

दर गोव्यावर अवलंबून
जिल्ह्यात काजूला चांगले उत्पादन असले तरी बाजारभाव हा पूर्णतः गोव्याच्या बाजारपेठेवर अवलंबून असतो. काजूचा घाऊक व्यापारीवर्ग हा दोडामार्ग, बांदा परिसरांतील असल्याने याच परिसरात काजूच्या खरेदीचा दर निश्‍चित होतो. जिल्ह्यात यंदा नैसर्गिक संकटाने काजूच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला. थंडीच्या कालावधीत बहरलेल्या काजूचा ढगाळ वातावरणाने मोहोर करपल्यामुळे उत्पन्नावर थेट परिणाम झाल्याची स्थिती आहे.

Web Title: 155 kg of nuts per