दिल्लीत गेलेल्या त्या 13 जणांना राजापूरात केले होम क्कांरन्टाईन....

168 people Home Quarantined in rajapur kokan marathi news
168 people Home Quarantined in rajapur kokan marathi news

राजापूर (रत्नागिरी) : परदेशातून आलेल्या 56 व्यक्तींसह त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती अशा 155 लोकांना यापूर्वी होम क्कांरन्टाईन केलेले आहे. असे असताना दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमाला गेलेल्या तालुक्यातील नाटे, नजफनगर येथील दोन व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अशा तेरा जणांना नव्याने होम क्कांरन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील होम क्कांरन्टाईन केलेल्यांची 168 संख्या झाली आहे.  

नाटे येथील होम क्कांरन्टाईन केलेल्या लोकांच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्याची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून त्यांना क्कांरन्टाईन करण्यात आले आहे.

होम क्कांरन्टाईन 168 संख्या

या सार्‍यांवर आरोग्य विभागाचे विशेष वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. परदेशातून तालुक्यात आलेल्या 56 आणि आंबोळगड येथील एका हॉटेलमध्ये परदेशी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या स्थानिक दहा व्यक्तींना यापूर्वीच होम क्कांरन्टाईन करण्यात आले होते. दरम्यान, मेंगलोर एक्सप्रेसमधून कोरोनाबाधित प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तालुक्यातील हरळ तसेच कोळंब येथील 28 जणांना तर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात सापडलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या सहवासात आलेल्या सहवासितांमुळे मोसम येथील तब्बल 61 जणांना होम क्कांरन्टाईन करण्यात आले आहे.

13 जणांना नव्याने होम क्कांरन्टाईन

दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्य कार्यक्रमाला तालुक्यातील नाटे येथील दोन व्यक्ती गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या अशा 13 जणांना नव्याने होम क्कांरन्टाईन करण्यात आले आहे. त्यांच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये कोरोनाबाबत कोणतीही लक्षण आढळली नसली तरी, खबरदारी म्हणून त्यांना होम क्कांरन्टाईन करण्यात आले आहे.

शहरातील वरचीपेठ येथील मराठी शाळा क्रमांक दोन, आडिवरे भक्त निवास आणि सागवे कात्रादेवी मंगल कार्यालय अशा तीन ठिकाणी विलीगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास या विलीगीकरण कक्षाचा वापर प्रशासनाकडून केला जाणार आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये क्कांरन्टाईन केलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com