जिल्ह्यात एका महिन्यात 1700 वाहनांची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

कणकवली - केंद्र शासनाने बीएस थ्री वाहन उत्पादनावर बंद घातल्यानंतर यंदा मार्च महिन्यात वाहन कंपन्यांनी मोठी सूट जाहीर केल्याने वाहनांची बंपर खरेदी झाली. एका मार्च महिन्यात तब्बल 1714 इतकी वाहनांची नोंदणी झाली असून, यात 1370 दुचाकी नोंदविल्या गेल्या आहेत. 

कणकवली - केंद्र शासनाने बीएस थ्री वाहन उत्पादनावर बंद घातल्यानंतर यंदा मार्च महिन्यात वाहन कंपन्यांनी मोठी सूट जाहीर केल्याने वाहनांची बंपर खरेदी झाली. एका मार्च महिन्यात तब्बल 1714 इतकी वाहनांची नोंदणी झाली असून, यात 1370 दुचाकी नोंदविल्या गेल्या आहेत. 

देशात सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिलपासून बीएस थ्री इंजिन असलेल्या वाहनांवर बंदी आणली होती, याकडे काही वाहन कंपन्यांनी दुर्लक्ष केले. मात्र याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार असे आदेश केंद्र सरकारने दिल्यानंतर या वाहनांचा स्टॉक असलेल्या वितरकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी सूट दिली. परिणामी जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वाहन खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली. जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे 31 मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या वाहनामध्ये एका महिन्यात मोटारसायकल 667, स्कूटर 703 मिळून 1370 दुचाकीची नोंदणी झाली, तर 4 चाकीमध्ये आलिशान कार 158, जीप 40, मीटर टॅक्‍सी 9, आरामदायी टुरिस्ट कॅब 5, ऑटोरिक्षा 43, मिनीबस 1, रुग्णवाहिका 2, ट्रक 24, चारचाकी व्हॅन 50, ट्रॅक्‍टर 5 तर इतर प्रकारची 7 वाहने मिळून एकूण 1714 वाहने नोंदविली गेली आहेत. 

जिल्ह्यात वाहन खरेदीमध्ये सर्वाधिक दुचाकी विकल्या जात असून, ऑटोरिक्षा तसेच खाजगी आलिशान कारला चांगली मागणी आहे. मंदीच्या सावटातून वाहन उद्योग उभारी घेत असून, न्यायालयाने बीएसथ्री वाहनावर बंदी घातल्यानंतर घसघशीत सूट मिळालेली वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या मात्र या महिन्यात लक्षणीय होती. 

Web Title: 1700 vehicles registration in the district one month