esakal | रत्नागिरीमध्ये 2 पोलिस, एका नर्ससह 21 जण कोरोना बाधित....
sakal

बोलून बातमी शोधा

2 policemen 21 including one nurse cororna positive in ratnagir total count 1767

21 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात 2 पोलिस आणि एका नर्सचा समावेश आहे. 

रत्नागिरीमध्ये 2 पोलिस, एका नर्ससह 21 जण कोरोना बाधित....

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार तालुक्यात 21 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात 2 पोलिस आणि एका नर्सचा समावेश आहे. 


तालुक्यात सापडलेल्या 21 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अशोकनगर परटवणे येथील 1, पोमेंडी बु. 1, जि. प. रेस्ट हाऊस समोर शांतीनगर नाचणे 2, साई नगर 2, खेडशी 1, पेठ पूर्णगड 1, जागूष्टे कॉलनी 1, वैभव विहार कॉम्प्लेक्स माळनाका 2, कुवारबाव पोलीस क्वाटर्स 1, बोर्डिंग रोड 1, कापडगाव बौद्धवाडी 1, सिविल ऍडमिट 2, 2 पोलीस कर्मचारी तर एका सिविल नर्सचा या 21 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्यांना दिलासा ; रत्नागिरीत महात्मा जोतिराव फुले योजने अंर्तगत हे शेतकरी झाले कर्जमुक्‍त...यांची लिस्ट बाकी... -

दरम्यान आज सकाळी  हर्णे,  तालुका दापोली येथील एका 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 झाली आहे. काल रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 75 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज २१ यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1767 झालेली आहे.


संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top