नोव्हेंबरपर्यत दोन हजार बंधारे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

रत्नागिरी - पावसाने लवकर विश्रांती घेतल्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे निर्माण होणार्‍या टंचाईच्या झळांची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने मिशन बंधारे हाती घेतले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी स्वतः बंधारे बांधण्याचा आरंभ केल्यानंतर आतापर्यंत दोन हजार 94 बंधारे बांधण्यात आले आहेत. यामुळे लाखो लिटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

जून, जुलैनंतर पावसाचा जोर ओसरला. ऑगस्टमध्ये सरासरी भरली; परंतु सप्टेंबरमध्ये सरासरी दोनशे मिलिमीटर नोंद झाली. या काळात कडकडीत ऊन पडले होते. त्यानंतर पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली. परतीच्या पावसाचा जोर जिल्ह्यात नव्हता. त्यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी पाणी साठवण्याचे प्रयोग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

यावर्षी जिल्हा परिषद प्रशासनाकडून 8 हजार 450 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यात वनराई, विजय आणि कच्चे बंधारे बांधण्यात येत आहे. लोकसहभागातून हे काम सुरू आहे. जिल्ह्यातील 845 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा बंधार्‍यांचे उद्दिष्ट आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत 2 हजार 95 बंधारे बांधले आहेत. दापोली तालुक्यात तेरेवायंगणी येथे सीईओ गोयल यांच्या उपस्थितीत महिलांनी एकत्रित येऊन बंधारा बांधला. डिसेंबरअखेरीस पन्नास टक्क्यांहून अधिक बंधारे बांधण्यात येतील.

उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावागावात बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत दहा बंधार्‍यांचे लक्ष्य जिल्हा परिषदेने निश्‍चित केले आहे.

- अरिफ शहा, जिल्हा कृषी अधिकारी

   तालुका       बंधारे

* मंडणगड    105 

* दापोली      415

* खेड         173

* चिपळूण     278

* गुहागर       223

* संगमेश्‍वर    214

* रत्नागिरी    176

* लांजा        146

* राजापूर      365

Web Title: 2000 water storage dams completed upto November