esakal | शेतकऱ्यांना दिलासा ; रत्नागिरीत महात्मा जोतिराव फुले योजने अंर्तगत हे शेतकरी झाले कर्जमुक्‍त...यांची लिस्ट बाकी...
sakal

बोलून बातमी शोधा

22 crore 74 lakh 82 thousand has been deposited in the accounts of 8099 farmers under Mahatma Jotirao Phule Farmers Debt Relief Scheme

खातेदारांची खाती प्रमाणित झाल्यानंतरच त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना दिलासा ; रत्नागिरीत महात्मा जोतिराव फुले योजने अंर्तगत हे शेतकरी झाले कर्जमुक्‍त...यांची लिस्ट बाकी...

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ८,०९९ शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी ७४ लाख ८२ हजार रक्कम जमा झाली आहे. ११ हजार ८३८ खातेदारांपैकी ८०९९ खातेदारांची कर्जमुक्ती झाली असून उर्वरित खातेदारांची खाती प्रमाणित झाल्यानंतरच त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाआघाडी सरकार आल्यानंतर काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. पहिल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात १८,६२८ शेतकरी निकषानुसार पात्र ठरलेले होते. राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ११ हजार ८३८ खातेदारांनी बॅंकांकडे नोंदणी केली होती.

हेही वाचा- धक्क्यावर धक्के...कारिवडेतील ग्रामस्थांचे धाबे दणाणले -

पावणेचार हजार खातेदार शिल्लक​

त्यानंतर कर्ज खात्यांची छाननी करून बॅंकांनी ९,५११ कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण करून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या. त्यापैकी ८६४३ खाती प्रमाणित केली, तर ८६८ खाती शिल्लक राहिली होती. प्रमाणित केलेल्या कर्जखात्यांपैकी ८,०९९ कर्जखात्यांवर २२ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये रक्‍कम वर्ग करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच शासनाकडून शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा-समस्यांवर समस्या...एकीकडे कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या अन् दुसरीकडे हे -

कर्जमाफी शेतकऱ्यांची तालुकानिहाय आकडेवारी


तालुका       शेतकरी            कर्जमाफी रक्कम 

मंडणगड      404             दोन कोटी 13 लाख 60 हजार 263

दापोली        402                60 लाख 39 हजार 897

खेड             852                दोन कोटी 11 लाख 69 हजार 675

चिपळून       1277             1 कोटी 79 लाख 28 हजार 842

गुहागर         646               1 कोटी 3 लाख 44 हजार 420

संगमेश्वर     1001             दोन कोटी 40 लाख 38 हजार987

रत्नागिरी      1035            दोन कोटी 82 लाख 86 हजार 558

लांजा           1238            चार कोटी 28 लाख 77 हजार 128

राजापूर         1244           पाच कोटी 54 लाख 44 हजार 230

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top