रत्नागिरीत सापडले आणखी 26 कोरोना पाॅझिटीव्ह.....

26 corona positive found in Ratnagiri district
26 corona positive found in Ratnagiri district

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा  आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.  आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्यातील २6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यातील १२, राजापुरातील ४, रत्नागिरीतील ६, कळंबणीतील 3 व संगमेश्वरमधील १ असे रूग्ण आहेत. नव्याने 26 रुग्णांची भर पडल्याने आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३4 वर पोहोचली आहे.

चिपळूणमधील १२ पॉझिटिव्ह रुग्णांमधील अकराजण तालुक्यातील धामेली गावातील आहेत. हे सर्व मुंबईहून आलेले आहेत. चार दिवसांपूर्वी या गावात सहा रुग्ण आढळले होते. त्यामुळे या गावातील रुग्ण संख्या 17 वर पोहचली आहे. तर तालुक्यातील एकूण संख्या आता 31 झाली आहे. तर आजच्या प्राप्त अहवालात एक पॉझिटिव्ह तालुक्यातील तिवडी गावातील आहे.

हेही वाचा- तरुणीला भाळून सीएची नियत ढळली -


चिपळूण तालुक्यात सपड्लेल्या 12 नव्या रुग्णांपैकी 11 जण एका गावातील आहेत. त्यास गावांत यापूर्वी पाच बाधित रुग्ण आढळले होते. उर्वरित एक रुग्ण हा तिवाडी या अतिदुर्गम भागातील आहे.  ते ठिकाण तालुक्यातील हिल स्टेशनं म्हणून ओळखले जाते. धमाली गावातील रुग्ण संख्या 17 झाली अडून अजून 15 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. 
राजापूर तालुक्यातील 4 बाधितांमध्ये 2 प्रिंदावणे तर 2 सागवे गावातील आहेत. नवीन चार रुग्ण सापडल्यामुळे राजापूर तालुक्यातील रुग्ण संख्या 21 झाली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com