esakal | रत्नागिरीतील मृत्यूदर होईल कमी कसा वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

26 ventilators received from the Central Government ratnagiri District  Information to Surgeon  Dr. Presented by Sanghamitra Phule

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले 

रत्नागिरीतील मृत्यूदर होईल कमी कसा वाचा

sakal_logo
By
राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : कोविडच्या रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार व्हावेत यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला 26 व्हेंटीलेटर केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहेत. नुकतेच हे व्हेंटीलेटर रत्नागिरी जिल्ह्यात प्राप्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी हे व्हेंटीलेटर उपयोगीय पडतील अशी आशा आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.


कोवीडच्या गंभीर रुग्णांवर उपचार करताना अनेक वेळा व्हेंटीलेटरची संख्या कमी असल्याने जिल्ह्यात मर्यादा येत होती. जिल्ह्यात अवघे 43 व्हेंटीलेटर होते. त्यातही शासकीय संख्या अगदीच कमी होती. त्यानंतर काही कंपन्यांनी व्हेंटीलेटर पुरवल्याने काही प्रमाणात आरोग्य यंत्रणेला मदत झाली होती. मात्र आणखी व्हेंटीलेटरची आवश्यकता होती. यासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे व्हेंटीलेटरसाठी प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाने त्यानंतर केंद्राकडे याबाबत मागणी केली होती.

हेही वाचा - बाप्पा गेले शाळेत अन् मुलांशी मारल्या गप्पा, मजेशीर देखावा वाचा...


24 ऑगस्ट रोजी व्हेंटीलेटर रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. यातील 10 व्हेंटीलेटर महिला रुग्णालय, 3 व्हेंटीलेटर कामथे उपजिल्हा रुग्णालय, 3 व्हेंटीलेटर दापोली उपजिल्हा रुग्णालय तर 10 व्हेंटीलेटर जिल्हा शासकीय रुग्णालयांना वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा -तोंडवलीत आगळे-वेगळे गौरी पूजन, ३२ प्रकारच्या खाद्यपदार्थांची आरास


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर रुग्णांची संख्या वाढली असून, मृत्यू दराचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांवर व्हेंटीलेटरच्या माध्यमातून उपचार करणे शक्य होणार असल्याचे डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.


संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top