स्पर्धा परीक्षा देवून व्हायचे होते अधिकारी, पण गळफास लावुन दिला जीव

26 year youth attend suicide in ratnagiri lanja
26 year youth attend suicide in ratnagiri lanja

लांजा (रत्नागिरी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)ही स्पर्धा परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्याच्या नैराश्यातून मानसिक संतुलन बिघडलेल्या २६ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कोर्ले येथे घडली आहे.

याबात लांजा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोर्ले गावातील सहकारवाडी येथील महेश लक्ष्मण झोरे (वय 26) हुशार आणि मेहनती मुलगा होता. त्याचे आई वडील व दोन भाऊ कामानिमित्त मुंबईत राहतात. महेश याला स्पर्धा परीक्षा देवून अधिकारी व्हायचे होते. परीक्षेची तयारी करण्यासाठी तो गावाकडील घरी एकटाच राहत होता. प्रभानवली येथील त्याचे आजोबा अधुन मधून महेशला भेटण्यासाठी कोर्ले गावी येत असत. नेहमीप्रमाणे ते गुरूवारी ते नातवाला भेटण्यासाठी दुपारच्या दरम्यान आले असता त्यांनी महेशला गळपास लावलेल्या अवस्थेत पाहिले. महेशने राहत्या घराच्या पडविच्या वाशाला गळफास लाऊन आत्मत्या केली होती.

हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळणार आता बोनस ; दरातही होणार वाढ
           
मात्र महेशने आत्मत्येपूर्वी चिठ्ठीमध्ये माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये. स्पर्धा परिक्षेची तारीख वारंवार पुढे ढकलली जात असल्या कारणाने माझे सतुंलन दिवसेंदिवस बिघडत जात होते. या कारणाने मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचे लिहले होते. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार चवेकर हे करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com