जिल्ह्यात 28 गावे कॅशलेसच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

अलिबाग, ता. 19 (बातमीदार) : पाचशे व हजारच्या नोटाबंदीनंतर आता कॅशलेस व्यवहार प्रणालीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने 28 गावे कॅशलेस करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक बॅंकेला एक गाव कॅशलेस करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्‍यातील सर्वाधिक सहा गावे कॅशलेस करण्यात येणार आहेत.

या संदर्भात जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी नुकतीच सर्व विभागांचे अधिकारी व बॅंक प्रतिनिधींची बैठक घेतली. प्रत्येक बॅंकेला एक गाव कॅशलेस करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी निवड झालेल्या गावांना भेटी देत आहेत. ग्रामसभा घेऊन कॅशलेस व्यवहारांची माहिती दिली जाणार आहे. जे गावकरी अद्याप बॅंकिंगशी जोडले गेले नाहीत, त्यांची खाती उघडून डेबिट कार्ड दिले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये मागणीनुसार पॉईंट ऑफ सेल (पॉस) मशिन्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यातून सर्व गावे कॅशलेस होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

तालुकानिहाय गावे
- अलिबाग : सहा
- पनवेल : पाच
- पेण : तीन
- कर्जत : दोन
- खालापूर : दोन
- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, मुरूड, सुधागड आणि उरण : प्रत्येकी एक

Web Title: 28 villages in the district of cashless way