काँग्रेसच्या २९ उमेदवारांची यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

चिपळूण - काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या २९ उमेदवारांची यादी जाहीर केली. रत्नागिरी तालुक्‍यात जागा वाटप अंतिम टप्प्यात असून जागेत 
वाढ होण्याची शक्‍यता त्यांनी वर्तवली; मात्र गुहागर, खेड आणि दापोली येथे काँग्रेस किती जागा लढविणार हे मात्र राणे यांनी जाहीर केलेले नाही. 

चिपळूण - काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या २९ उमेदवारांची यादी जाहीर केली. रत्नागिरी तालुक्‍यात जागा वाटप अंतिम टप्प्यात असून जागेत 
वाढ होण्याची शक्‍यता त्यांनी वर्तवली; मात्र गुहागर, खेड आणि दापोली येथे काँग्रेस किती जागा लढविणार हे मात्र राणे यांनी जाहीर केलेले नाही. 

राजापूर व लांजा तालुक्‍यात काँग्रेस भक्कम असल्याने येथे सर्वाधिक जागा काँग्रेसने आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत.  त्या पाठोपाठ संगमेश्वर तालुक्‍यातही दोन जिल्हा परिषद गट व तीन पंचायत समिती गण काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत; मात्र चिपळूणमध्ये केवळ १ जिल्हा परिषद व २ पंचायत समिती गणावर समाधान मानावे लागले.

आज जाहीर केलेल्या यादीमध्ये राजापूर तालुका जिल्हा परिषद गट - वसंत यशवंत पाटील (देवाचे गोठणे), आशा हरिश्‍चंद्र काजवे (सागवे), सावित्री सत्यवान कणेरी (कोदवली), निशिगंधा भास्कर सुतार (पाचल). पंचायत समिती गण : अशोक लक्ष्मण तोरसकर (देवाचे गोठणे), विजया वसंत शिंदे (सागवे), योगेश गोपाळ नकाशे (कोदवली), राजेश हरिश्‍चंद्र गुरव (भालावली), बाजीराव सा. विश्वासराव (ताम्हाणे), स्नेहा विकास कोलते (ओझर), वैष्णवी संतोष कुळ्ये (केळवली) व रिया राजेंद्र मयेकर (कोंड्ये तर्फे सौंदळ). 

लांजा तालुका जिल्हा परिषद गटामध्ये आर्या अनिल बडद (गवाणे), सिद्धी शशिकांत पांचाळ (वाकेड), प्रभाकर टोळे (देवधे), लांजा पंचायत समितीसाठी मुनाफ अबू दसूरकर (गवाणे), विश्वनाथ भिकाजी चौगुले (खानवली), शांताराम यशवंत गाडे (वाकेड), सुप्रिया सचिन मांजळकर (साटवली), प्रज्ञा पेंढारी (देवधे), आर्या दीपक आयरे (भांबेड). 

संगमेश्वर तालुक्‍यातील जिल्हा परिषद निवडणुकांसाठी धनलक्ष्मी रवींद्र जोयशी (दाभोळे), दिलीप गणपत मोहिते (कसबा) व पंचायत समितीमध्ये विधानी दत्तात्रय परकर(आरवली), अपर्णा प्रकाश वाझे (मोर्डे) व दीप्ती दीपक सावंत (कोसुंब). चिपळूणमधील पेढे जि.प. गटासाठी मेघना 
मंगेश शिंदे आणि पंचायत समितीमध्ये अप्पा भुवड (अलोरे) व सिद्धार्थ कदम (कुटरे) या उमेदवारांची नावे नीलेश राणे यांनी जाहीर केली.

Web Title: 29 candidate congress list declare