महडमधील विषबाधेत 3 लहान मुलांचा मृत्यू, 25 जण गंभीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

महड : रायगडमधील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथे वास्तूशांतीच्या पुजेतील जेवणातून 50 ते 60 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पनवेलमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहे.

खालापूर तालुक्यातील महड येथील माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला. 50 ते 60 जणांना विषबाधा झाल्याची माहिती असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत 3 लहान मुलांचा मृत्यू झाला. तर 25 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेलमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: 3 died in food poisoning 25 are serious in mahad raigad

टॅग्स