सात-बारा ऑनलाइनचे ३० टक्के काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

राजापूर - शेतकऱ्यांसाठी तलाठ्यांमार्फत देण्यात येणारे जमिनींचे सात-बारा उताऱ्यांसह अन्य कागदपत्र ऑनलाइन करण्याचे काम तालुक्‍यामध्ये जोमाने सुरू आहे. मे-जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य  महसूल विभागाने ठेवल्याची माहिती तहसीलदार शरदचंद्र गीते यांनी दिली. सध्या हे काम तीस टक्के पूर्ण झाल्याने दोन महिन्यांमध्ये उर्वरित ७० टक्के पूर्ण करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे.   

शेतजमीन मालकीची असल्याचा पुरावा म्हणून शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना सात-बारा उतारा आणि आठ-अ दिला जातो. या सात-बारा उताऱ्यावर संबंधित जमीन मालकाच्या नावाची नोंद केली जात असून; संबंधित जमिनीचे स्वरूप, क्षेत्रफळ याची नोंद केली जाते. तलाठ्याच्या कार्यक्षेत्राचा विस्तार आणि त्याच्याकडे असलेला अतिरिक्त कारभाराची जबाबदारी पाहता शेतकऱ्यांना सात-बारा उताऱ्यासाठी दहा-बारा दिवस वाट पाहावी लागते. त्यामुळे जमिनींचे सात-बारा उतारा, आठ-अ आणि फेरफार हे कागदपत्र ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तालुक्‍यातील जमिनींचे सात-बारा आणि अन्य दस्तऐवज महसूल विभागातर्फे यापूर्वी ऑनलाइन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्याने ऑनलाइन सात-बारा उतारे कार्यक्रमाचा बोजवारा उडाला होता. त्याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले होते. 

या पार्श्‍वभूमीवर पुन्हा नव्याने ऑनलाइन करण्याचे काम हाती घेण्यात आले. ऑनलाइन सातबारा उतारे करण्याचे काम तीस टक्के पूर्ण झाले. दोन महिन्यांमध्ये उर्वरित काम पूर्ण करण्याचे लक्ष्य महसूल प्रशासनाने ठेवले आहे. 

तलाठ्यांच्या कामांचे मूल्यमापन
ऑनलाइन सातबारा उतारे करण्याच्या कार्यक्रमामध्ये गतिमानता यावी आणि त्यातूनच तलाठ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून तलाठ्यांच्या दरदिवशी होणाऱ्या कामकाजाचे मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये अग्रेसर असलेल्या प्रथम कमाकांच्या तलाठ्यांच्या नावांचा उल्लेख असलेला फलक तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.

Web Title: 30 percent work full seven-twelve online