ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले ३१ कोरोना पॉझिटिव्ह....

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 7 July 2020

जिल्ह्यात आणखी 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

रत्नागिरी : काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार  जिल्हयात 31 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 781 झाली आहे.

 
परवाच 40 कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी 31 रुग्ण आढळले आहेत.  काल सायंकाळपासून पॉझिटिव्ह रुग्णांना पुढीलप्रमाणे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

हेही वाचा- सलग दुसऱ्या दिवशी घडला प्रकार ;  रत्नागिरीत या वकिलाने केली आत्महत्या... -

जिल्हा कोव्हीड रुग्णालय - 12 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे-6 रुग्ण
दापोली - 13 रुग्ण, या रुग्णांचा यात समावेश आहे.