भाजपच्या दबावाखाली ३४ जणांवर गुन्हा - भास्कर जाधव

Bhaskar-Jadhav
Bhaskar-Jadhav

गुहागर - नांगरणी स्पर्धेदरम्यान प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याबद्दल स्पर्धा आयोजक म्हणून जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनायक मुळे, इम्रान घारे यांच्यासह स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलगाडीचालकांवर दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

सदर गुन्हे गुहागर तालुक्‍यातील भाजप नेत्याच्या दबावातून नोंदविले गेल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. यामुळे प्राण्यांना क्रूर वागणुकीचा मुद्दा बाजूला  पडला आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या नांगरणी स्पर्धेवर पोलिसांनी कारवाई केली. गुहागर तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथमच नांगरणी स्पर्धेचे आयोजन केले होते. घाटी व गावठी बैलजोडी अशा दोन गटात ही स्पर्धा होती. ७ ऑगस्टला स्पर्धेचे आयोजन केले होते. 

मात्र महापुरामुळे स्पर्धा १६ ऑगस्टला झाली. शृंगारतळीतील या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेआधी देवरुखमध्ये भाजपतर्फे भरविण्यात आलेल्या नांगरणी स्पर्धेत बैल उधळून प्रेक्षकात शिरले. त्यावरून जोरदार टीका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिसांनी प्राण्यांना क्रुरतेने वागवणे प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे स्पर्धा संयोजक व बैलगाडी चालक अशा ३४ जणांवर गुन्हा दाखल केला.  पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पवार तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com