सिंधुदुर्गातील ३६ रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कुडाळात नेत्र चिकित्सा महाशििबर; ७५० जणांनी घेतला लाभ; मुंबईत झाले उपचार

कुडाळ - बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग व कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय एकनाथ ठाकूर स्मृती नेत्र चिकित्सा महाशिबिर येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित केले होते. या शिबिराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साडे सातशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.

कुडाळात नेत्र चिकित्सा महाशििबर; ७५० जणांनी घेतला लाभ; मुंबईत झाले उपचार

कुडाळ - बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग व कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय एकनाथ ठाकूर स्मृती नेत्र चिकित्सा महाशिबिर येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित केले होते. या शिबिराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साडे सातशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.

या शिबिरास जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व जे. जे. रुग्णालय नेत्र चिकित्सा प्रमुख डॉ. रागिणी पारेख या टीमने डोळ्यांच्या विविध आजारांवर प्राथमिक औषधोपचार केले होते. ज्या रुग्णांच्या डोळ्यात मोतिबिंदू आढळला अशा रुग्णांना मुंबई सर जे. जे. रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी मार्गदर्शन केले. शस्त्रक्रिया करण्यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व डॉ. अमेय देसाई यांनी संपूूर्ण व्यवस्थेची जबाबदारी संयुक्तपणे घेतली. याचा लाभ सिंधुदुर्गातील ३६ रुग्णांनी घेतला. 

९ ला सायंकाळी सहा वाजता बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्रा. प्रणाली मयेकर आणि बॅ. नाथ पै सेंट्रल स्कुलचे सहाय्यक शिक्षक प्रसाद कानडे यांच्या नेतृत्वाखाली मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी ३६ रुग्णांची बस रवाना करण्यात आली. रुग्णांच्या सेवेसाठी भाजप महाराष्ट्र कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण यांनी मोफत नाष्टा तसेच दीपक वालावलकर यांनी मोफत पाण्याची सोय केली. मुंबई सेंट्रल रेल्वेचे वित्त अधिकारी पांडुरंग तुकाराम चव्हाण यांनीही अत्यंत मोलाचे सहकार्य केले. सर जे. जे. रुग्णालय येथे १० ला ३६ रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्वीच्या सर्व प्राथमिक तपासण्या करण्यात येऊन ११ ला जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व जे. जे. रुग्णालय नेत्र चिकित्सा प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या हस्ते शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाला. या सर्व रुग्णांना कुडाळ येथे आणण्यात आले.

याबद्दल सर जे. जे. रुग्णालयातून देण्यात आलेली रुग्णसेवा व सहकार्याबद्दल रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच डॉ. अमेय देसाई आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांचेही आभार मानले. यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, डॉ. अमेय देसाई यांनी परिश्रम घेतले. याला संस्थेचे सीईओ डॉ. अजिज पठाण तसेच नागराज सुनगार, समिर तारी, परेश धावडे, स्वरा गावडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.

Web Title: 36 patient Cataract surgery