Sindhudurga : जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू

नवे ३० रुग्ण; २० जण झाले कोरोनामुक्त
koikan
koikansakal

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन रुग्ण ३० मिळाले आहेत. उपचार घेत असलेल्या चार रुग्णाचे निधन झाले आहे. २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५२ हजार १६० कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील ४९ हजार ६४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १४०९ रुग्णाचे निधन झाले आहे. १ हजार १०० रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ९३ रुग्ण उपचार घेत आहेत.

सहा रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेले आहेत. उर्वरित १ हजार ७ रुग्ण होम आयसोलेटेड आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज मिळालेले रुग्ण- दोडामार्ग २ , कणकवली ८, कुडाळ ६, मालवण ११, सावंतवाडी २ , वेंगुर्ले १. तालुकानिहाय सक्रिय रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) - देवगड ९८ (१७६), दोडामार्ग २४ (४०), कणकवली १६८ (२९४), कुडाळ २८८ (२३६), मालवण १८६ (२७९), सावंतवाडी १७६ (१९२), वैभववाडी ३१ (८१), वेंगुर्ला ११७ (१०६) जिल्ह्याबाहेरील रुग्ण १२ (९).११०० रुग्ण सक्रिय असून त्यापैकी ५६ रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३८ रुग्ण ऑक्सीजनवर तर १८ रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे.

आर.टी.पी.सी.आर टेस्ट मध्ये २ लाख ८८ हजार १३१ नमुने तपासण्यात आले. यातील ३७ हजार २२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने १४६५ नमूने घेण्यात आले. ॲन्टिजन टेस्टमध्ये एकूण २ लाख ७८ हजार ५७८ नमुने तपासले. पैकी १५ हजार ४३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन ७० नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण ५ लाख ६७ हजार ७०९ नमूने तपासण्यात आले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कोरोनाने चार रुग्णाचे निधन झालेले नाही. कुडाळ तालुक्यातील झाराप येथील ६३ वर्षीय पुरुष, सोनवडे येथील ६५ महिला, कुडाळ शहरातील ३२ वर्षीय महिला व दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com