पालीत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अमित गवळे
रविवार, 31 मार्च 2019

पाली : येथील समर्थनगर, भोराई कॉम्लेक्स, वरदविनायक कॉम्लेक्स व चिले कॉम्लेक्स या चार ठिकाणी शनिवारी (ता.29) मध्यरात्री घरफोड्या झाल्या. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाली : येथील समर्थनगर, भोराई कॉम्लेक्स, वरदविनायक कॉम्लेक्स व चिले कॉम्लेक्स या चार ठिकाणी शनिवारी (ता.29) मध्यरात्री घरफोड्या झाल्या. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवारी (ता.29)  स्वामी समर्थनगरातील फ्लॅट नं 105 मध्ये राहणारे विशाल नामदेव शिंदे हे नेहमीप्रमाणे नाडसूर येथील आपल्या घरी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेवून चोरट्यानी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.  कपाटातील सोन्याचे दागिने यामध्ये ळ्यातील सोन्याचा सर, 1 तोळ्याची चैन, 1 तोळ्यातील काणातील मोठे रिंग, गळ्यातील लॉकेट असे जवळपास 92 हजाराचे दागिने व 12 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. तसेच पालीतील भोराई कॉम्लेक्स मधील दत्तात्रेय मारुती पाटील यांचे बंद घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला तर चिले कॉम्लॅक्स येथील नाना उतम पाटील, आत्माराम दत्तात्रेय दळवी (फ्लॅट नं. 104) यांचे बंद घर उघडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे समजते. याबरोबरच वरदविनायक कॉम्प्लेक्स मधील विवेक कर्जेकर यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. त्यांच्या घरातून नेमके काय चोरीला गेले याबाबत उशीरापर्यंत माहिती मिळू शकली नाही. 

 या घरफोड्यांची माहिती मिळताच पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिसांनी घरफोड्या झालेल्या ठिकाणी जावून पंचनामा केला. पाली पोलिसांनी मध्यरात्री पोलीस व्हॅनची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 robbery in one night at pali crates Question mark on police efficiency