रत्नागिरी जिल्ह्यातील 45 गुन्हेगार फरारी घोषित

राजेश शेळके
Tuesday, 27 August 2019

रत्नागिरी - विविध गुन्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे पोलिसांना हवे असलेले; परंतु वारंवार गुंगारा देणार्‍या जिल्ह्यातील 45 गुन्हेगारांना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. त्यापैकी काहींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्य गुन्ह्यांमध्ये हवे असलेले किंवा नाव निष्पन्न झालेल्या 201 संशयितांच्या शोधात जिल्हा पोलिस आणि विशेष करून स्थानिक गुन्हे शाखा आहेत.  

रत्नागिरी - विविध गुन्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे पोलिसांना हवे असलेले; परंतु वारंवार गुंगारा देणार्‍या जिल्ह्यातील 45 गुन्हेगारांना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. त्यापैकी काहींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्य गुन्ह्यांमध्ये हवे असलेले किंवा नाव निष्पन्न झालेल्या 201 संशयितांच्या शोधात जिल्हा पोलिस आणि विशेष करून स्थानिक गुन्हे शाखा आहेत.  

जिल्ह्याला गुन्हेगारीची तशी फार मोठी किनार आहे. पूर्वी सोन्याच्या तस्करीपासूनचे गुन्हे घडले आहेत. त्यानंतर त्यावर कायद्याने चांगले नियंत्रण मिळविले होते. परंतु दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेल्या क्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी रत्नागिरी जिल्ह्याची नाळ जोडली गेली आहे.

मुंबई, पुणे किंवा पश्‍चिम महाराष्ट्रीतील एका पोलिस ठाण्याचा गुन्ह्यांचा सीआर असता तेवढा संपुर्ण जिल्ह्याच्या असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. झटपट आणि सहज पैसा मिळविण्यासाठी किंवा व्यक्तिगत वादातून खून, बलात्कार, मारामारी, दरोडा, चोरी, खूनाचा प्रयत्न, मालमत्तेचे गुन्हे आणि इतर गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे.

गुन्हेगार देखील स्मार्ट होऊन पोलिसांच्या एक पाऊल पुढे टाकून गुन्हा करतात. त्यामुळे अनेक गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत, कोणी निष्पन्न होऊनही मिळत नाही, तर कोणाला अटक करून पुन्हा हजर होत नाहीत, अशा विविध प्रकारच्या आरोपींच्या मागावर जिल्हा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा आहे.

मालमत्ता, शारीरिक इजा आणि इतर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना विविध गुन्ह्यातील 45 आरोपी निष्पन्न झाले आहेत. कायदेशीर सर्वबाबींचा वापर करून देखील ते पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पोलिसांनी दाद मागितली. वस्तूस्थिती पाहून न्यायालयाने जिल्ह्यातील 45 आरोपींना फरारी घोषित केले आहे. त्यांना दिलेल्या ठरावित मुदतीमध्ये ते हजर झाले नाहीत तर पुढची प्रक्रिया आवलंबून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव निष्पन्न झालेले परंतु पोलिसांना हवे असलेल्या आणि गुन्ह्यामध्ये नाव निष्पन्न झालेले 201 आरोपींच्या मागावर पोलिस आहेत.

न्यायालयीन प्रक्रियेतुन फरारी घोषित केलेले 45 आरोपी आहेत. तर विविध गुन्ह्यांमध्ये हवे असलेले आणि निष्पन्न झालेले 201 आरोपी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. साधारण 30 ते 35 वर्षांपासून हे फरारी आहेत.
- शिरीष सासणे,
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 criminals declared as abducted in Ratnagiri district