वर्षात 460 अपघात; 110 मृत्यू 

प्रणय पाटील - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 19 जानेवारी 2017

अलिबाग - वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, मार्गाची दुरावस्था, रखडलेले चौपदरीकरण, भरधाव वाहने यामुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्षभरात रायगड जिल्हा पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गावर 460 अपघात झाले. त्यामध्ये 110 जणांचा मृत्यू ओढवलाड तर 544 जण जखमी झाले. विशेष म्हणजे या मार्गावर सहा वर्षांत तीन हजार 153 अपघात होऊन 684 जणांचा मृत्यू झाला. 

रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते कशेडी या 154 किलोमीटर दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू आहे. दररोज एक लाख 85 हजार 942 मेट्रिक टन वजनाची वाहतूक होते. पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुदत संपूनही हे काम रखडले आहे. केवळ 40 टक्केच काम पूर्ण झाले आहे. महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या सर्व बाबींमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते. 

जानेवारी ते डिसेंबर 2016 या दरम्यान महामार्गावर 460 अपघात झाले. त्यामध्ये 110 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्‍यांवर वाहतूक पोलिस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. एवढे करूनही अपघातांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

Web Title: 460 accident in year,110 dead