‘रेल-ओ-टेल’मध्ये राज्याचे ५ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

सावंतवाडी - येथील रेल्वे टर्मिनसवर साकारणात येणाऱ्या रेल-ओ-टेल या प्रकल्पासाठी राज्य सरकार चांदा ते बांदामधून पाच कोटींची गुंतवणूक करणार आहे. सुमारे दहा कोटींच्या या प्रकल्पातून पर्यटन वाढीसाठी चालना मिळणार आहे.

सावंतवाडी - येथील रेल्वे टर्मिनसवर साकारणात येणाऱ्या रेल-ओ-टेल या प्रकल्पासाठी राज्य सरकार चांदा ते बांदामधून पाच कोटींची गुंतवणूक करणार आहे. सुमारे दहा कोटींच्या या प्रकल्पातून पर्यटन वाढीसाठी चालना मिळणार आहे.

रेल-ओ-टेल अर्थात रेल्वे मार्गावरील हॉटेल प्रकल्पाची घोषणा या आधी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. यात राज्य सरकारनेही चांदा ते बांदा मधून पाच कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुंबईत पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या प्रकल्पाला जोडून पर्यटन पॅकेज बनविण्याचा निर्णय यावेळी झाला. यात रेल्वेतून येणाऱ्या पर्यटकांची निवासव्यवस्था व हॉटेलपासून जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे पॅकेज बनविण्याचे ठरले. या प्रकल्पाची किंमत साडेसात ते दहा कोटी आहे. 

भारतीय रेल्वेचा आयआरसीटीसी व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोकण रेल्वे कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यात चांदा ते बांदा योजनेतून २०१६-१७ मध्ये दीड कोटी तर २०१७-१८ मध्ये साडे तीन कोटीची तरतूद केली जाणार आहे.

आयआरसीटीसी अडीच कोटी देणार आहे. हे हॉटेल चालविण्याची जबाबदारी आयआरसीटीसीची असणार आहे.

बैठकीत हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने समन्वय समिती स्थापन केली. पंधरा दिवसात ते आपला अहवाल देणार आहेत. त्यानंतर आवश्‍यक करारपत्र करून या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अंतिम रुप दिले जाईल. यावेळी एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, सावंतवाडी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, आयआरसीटीसीचे अरविंद मालखेदे, पद्ममोहन टी, पिनाकीन मोरावाला, कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता आदी उपस्थित होते.

Web Title: 5 crore in rail-o-tel