पशुवैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षामुळे पालीत 5 बकर्‍यांचा मृत्यु

अमित गवळे
बुधवार, 28 मार्च 2018

पाली (रायगड) : येथील सावंतआळीत राहणाऱ्या वनिता विद्याधर पाटील यांच्या पाच बकर्‍या अचानकपणे दगावल्या. आजारी बकऱ्यांच्या उपचारसाठी पशुवैद्यकीय विभागाने तातडीने दखल न घेता वेळीच उपाययोजना न केल्यामुळे संतप्त महिलेने या मृत बकर्‍या बुधवारी (ता. 28) पाली पंचायत समितीच्या दारात आणून ठेवल्या. व नुकसानभरपाईची मागणी केली. 

यावेळी माजी जि.प सदस्या गिता पालरेचा, पाली-सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, पशुवैद्यकीय अधिकारी सोमनाथ भोजने, गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे आदी उपस्थीत होते. यावेळी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पशुवैद्यकीय अधिकारी व पशुपालक यांच्यात वाद झाला. 

वनिता पाटील यांच्या एकूण 8 बकर्‍या होत्या. त्यातील 5 बकर्‍या मृत झाल्या. यामध्ये 1 बोकड व 4 बकर्‍यांचा समावेष आहे. आजारी बकर्‍यांवर उपचार करण्यासाठी वनिता पाटील यांनी पालीतील पशुवैद्यकीय दवाखान्यासह पाली पंचायत समितीत चकरा मारल्या. सबंधीत अधिकारी व कर्मचारी यांनी पाटील यांच्या बकर्‍यांवर वेळीच इलाज करण्यात चालढकल केली. या बकर्‍यांवर वेळीच योग्य उपचार झाला असता तर कदाचीत या बकर्‍यांचे प्राण वाचले असते. असे वनिता पाटील यांनी सांगितले. वनिता पाटील यांच्या 8 पैकी 3 बकर्‍या जिवंत असून त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावा व त्यांचे प्राण वाचावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी सोमनाथ भोजने यांनी सांगितले की बकर्‍यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन केल्यानंतरच समोर येईल. परंतू या बकर्‍या विषबाधेने अथवा उष्माघाताने दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

पशु संवर्धन विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे
पाली पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या एकूण 8 जागा आहेत. येथे केवळ 2 पशुधन पर्यवेक्षक आहेत. तर 6 जागा रिक्त आहेत. त्यामुळे येथे असे प्रकार घडताना दिसतात. येथे कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. पशुपालकांनी जनावरे मोकाट न सोडता बंदीस्त ठेवून त्यांची योग्य निगा राखावी. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था वेळच्यावेळी करावी. असे आवाहन यावेळी वैद्यकीय अधिकारी सोमनाथ भोजने यांनी केले.
 
Web Title: 5 goat deaths due to ignorance of veterinary department