रत्नागिरीवासियांनी दिलासा; बाधितांच्या संख्येत 50 टक्के घट

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही ४.६५ टक्क्यापर्यंत खाली आला
रत्नागिरीवासियांनी दिलासा; बाधितांच्या संख्येत 50 टक्के घट

रत्नागिरी : कोरोनाच्या (corona testing) चाचण्या वाढवताच जिल्ह्यातील दैनंदिन बाधितांच्या संख्येत पन्नास टक्केने घट झाली. ही दिलासादायक बाब आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही (posotivity rate) ४.६५ टक्क्यापर्यंत खाली आला. याचा जिल्ह्यातील निर्बंध शिथिलतेसाठी (ratnagiri district) फायदा होऊ शकतो. दरम्यान, मागील चोवीस तासांतील ८ आणि त्यापूर्वीचे ८ अशा सोळा मृतांची नोंद झाली. (50 percent rate of corona dead patients decreased in ratnagiri)

जिल्ह्यात शनिवारी ५ हजार ३९५ जणांच्या चाचण्या झाल्या. त्यातील ५ हजार १४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सध्या पाच हजारांपर्यंत चाचण्या होत आहेत. चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्हिटी दर कमी झाला असला तरीही मागील चार दिवसांत पाचशेच्या दरम्यान बाधित सापडत होते. शनिवारी मोठ्या प्रमाणात चाचण्या होऊनही बाधितांमध्ये घट झाल्याने दिलासा मिळाला. ही संख्या अशीच कायम राहिल्यास रत्नागिरीतील वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळेल. जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये बाधित आलेल्या १३७ जणांची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण आकडा ४७ हजार ४५१ वर पोचला आहे.

रत्नागिरीवासियांनी दिलासा; बाधितांच्या संख्येत 50 टक्के घट
माझी माऊली कायमची गेली अन् 'बाप'च आम्हा भावंडांची 'आई' बनला!

दिवसभरातील बाधितांमध्ये सर्वाधिक ९१ रत्नागिरी तालुक्यातील असून पॉझिटिव्हिटी दर ११.२८ टक्के आहे. इतर तालुक्यात मंडणगड २ (0.७३ टक्के), दापोली ३५ (७.१९), खेड १५ (१.८८), गुहागर ६ (४.०५), चिपळूण ५६ (५.0८), संगमेश्‍वर २० (१.७७), लांजा १३ (३.३७), राजापूर १३ (४.९६) बाधित आहेत. शनिवारी जिल्ह्यात ८ मृतांची नोंद झाली. त्यात रत्नागिरीत ४, लांजा १, दापोली २, खेड १ मृत आहे. आतापर्यंतच्या मृतांची संख्या १ हजार ६२३ वर पोचली असून, मृत्यूदर ३.४२ टक्के आहे. मागील काही दिवसांत मृत पावलेल्यांमधील ८ जणांची आज नोंद झाली. त्यामध्ये महिला रुग्णालय ४, चिपळूण खासगी रुग्णालय २, लांजा व कळंबणी येथील प्रत्येकी १ मृताचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com