गोवा बनावटीच्या तब्बल 5280 बाटल्या जप्त; कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई | Liquor Seized | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवा बनावटीच्या तब्बल 5280 बाटल्या जप्त; कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई

गोवा बनावटीच्या तब्बल 5280 बाटल्या जप्त; कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांदा - गोवा राज्यातून बांदा - दाणोलीमार्गे कोल्हापूरच्या दिशेने बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज सायंकाळी उशिरा कारवाई केली. सदर कारवाईत गोवा बनावटीच्या तब्बल ५२८० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दारु वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो (एपी २४ वाय ५८८५) व २०० दारु बॉक्स असा एकूण २० लाख ७३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: 100 कोटीची आॅफर नाकारली पण, पक्ष सोडला नाही म्हणणारे दगडफेक करतायेतं...

बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी साईराजू सत्तैह सुंकराबोईना (वय २७, रा. नालगोंडा, तेलंगणा) व कुंभमसतीश सुदर्शन रेड्डी (वय २३, रा. चेरलापल्ली, तेलंगणा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक डॉ. एच बी तडवी, निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, के. डी. कोळी, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी करीत आहेत.

loading image
go to top