दीड महिन्यात ५६ टक्‍के पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

कणकवली - सिंधुदुर्गात अवघ्या दीड महिन्यात ५६ टक्‍के पाऊस झाला. पुढील काळातही मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने यंदा ४ हजार मिलिमिटरची सरासरी ओलांडणार अशी शक्‍यता आहे. 

आत्तापर्यंत किनारपट्टीच्या देवगड, मालवण तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ सावंतवाडी, कुडाळ येथे पाऊस बरसला. त्यातुलनेत दोडामार्ग, कणकवली तालुक्‍यात पावसाची सरासरी कमी आहे.

सिंधुदुर्गात आजपर्यंत सरासरी २०१०.३६ मिलिमिटर एवढा पाऊस झाला, तर ३६०९.९८ मिलिमिटर एवढे जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान आहे. यंदा ४ जूनपासून सिंधुदुर्गात मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली. त्यानंतर अखंडपणे मुसळधार सुरू आहे. यात अवघ्या दीड महिन्यातच ५६ टक्‍के एवढा पाऊस झाला आहे, तर हवामान खात्याने पुढील तीन दिवस पाऊस सुरूच राहिला असा अंदाज वर्तवला आहे.

यंदा मालवण, देवगड, वेंगुर्ले या किनारपट्टी तालुक्‍यांना झोडपून काढले. या तीनही तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस कोसळल्याची नोंद तेथील जिल्हा नियंत्रण कक्षात झाली. 

पडझडीच्या घटनेत  साडे पाच लाखाची हानी
आजगाव येथील सावित्री पायनाईक यांच्या घरावर फांदी कोसळून ३० हजार, सांगेलीतील विनायक सावंत यांच्या घरावर फांदी कोसळून २० हजार २५०, कुंभार्लीत महेश पवार यांच्या घरावर झाड कोसळून ३ लाख, शेर्लेतील महेश धुरी यांच्या घराची भिंत कोसळून दीड लाखाचे नुकसान, मळगांवात सीता नाटेकर यांच्या घराची भिंत कोसळून ५० हजारर, आरोंदात वामन रेगे यांच्या घरावर झाड पडून ३२ हजार ६००, आरोंदात गजानन मातोंडकर यांच्या घरावर झाड पडून १४ हजार ४२५, प्रशांत घोगळे यांचा मांगर कोसळून ४५ हजार रूपयांचे नुकसान झाले.

आज, उद्या मुसळधार
सिंधुदुर्गातील अनेक भागांमध्ये १३ आणि १४ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केला आहे. तसेच या कालावधीत नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचनाही आपत्ती निवारण कक्षाने दिल्या आहेत.

Web Title: 56 per cent of the rain and half months