पावसानंतरही ६३ वाड्यांमध्ये टंचाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

संगमेश्‍वर - ३६ वाड्यांना टॅंकरची प्रतीक्षा

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यात सद्यःस्थितीत ३० गावांतील ६३ वाड्यांमध्ये टंचाई आहे. यातील १८ गावांतील २७ वाड्यांना ३ शासकीय टॅंकरने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, तर १२ गावांतील ३६ वाड्या अद्यापही टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत. 

संगमेश्‍वर - ३६ वाड्यांना टॅंकरची प्रतीक्षा

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यात सद्यःस्थितीत ३० गावांतील ६३ वाड्यांमध्ये टंचाई आहे. यातील १८ गावांतील २७ वाड्यांना ३ शासकीय टॅंकरने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, तर १२ गावांतील ३६ वाड्या अद्यापही टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत. 

सद्यःस्थितीत तालुक्‍यातील निवळी-धनगरवाडी, बेलारी खुर्द माची धनगरवाडी, फुणगूस मुस्लिम मोहल्ला, धडशीवाडी, शृंगारपूर कातुर्डीकोंड, पाचांबे-नेरदवाडी, जखीण टेप, मेढे, कांटे-सांडीमवाडी, शेनवडे-गवळीवाडी, दंड, राजिवली कुटगिरी, येडगेवाडी, काविलटेक, काटवली-तळेवाडी, घागवाडी, राईनवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी, ढोसलवाडी, कोसुंब-बौद्धवाडी, फेफडेवाडी, फुगीची वाडी, तुरळ-हरेकरवाडी, माभळे-गवळीवाडी, असुर्डे-साखळकोंड, बौद्धवाडी, भिरकोंड-बौद्धवाडी, पुर्येतर्फे देवळे-धनगरवाडी, गवळीवाडी, मुर्शी-धनगरवाडी, मासरंग-धनगरवाडी या गावांमध्ये २ शासकीय व १ खासगी टॅंकरने एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू आहे.

अजूनही ओझरे खुर्द, कोंडओझरे बडदवाडी, तळवडे-मावळतवाडी, उगवतवाडी, मधलीवाडी, आंगवली-सोनारवाडी, कुळ्ये-मधलीवाडी, धनगरवाडी, निगुडवाडी-बौद्धवाडी, गुरववाडी, हरपुडे-धनगरवाडी, साखरपा-जाधववाडी, सायले-तळवाडी, बौद्धवाडी, भडकंबा-नवालेवाडी, बौद्धवाडी, बेंडेवाडी, पाष्टेवाडी, बाईतवाडी, करजुवे-वाकसाळवाडी, चांदीवडेवाडी, मावळतवाडी, बाचीमवाडी, डावलवाडी, तिसंगवाडी, सुतारवाडी, विचारेकोंड, बौद्धवाडी, निवेखुर्द-बौद्धवाडी, गुरववाडी, उजगाव-बडदवाडी, कानसरेवाडी, बौद्धवाडी, भडकंबा-पेठवाडी, फणसवळे-मोर्डेकरवाडी, देवळे-बौद्धवाडी, पुनर्वसन या १२ गावांतील ३६ वाड्या टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या आठवड्यात तालुक्‍यात सलग ३ दिवस मुसळधार पाऊस कोसळला; मात्र त्याचा पाणीटंचाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. यावर्षी पाऊस लवकर असला तरी अजूनही मे महिना संपायला १५ दिवस बाकी असल्याने टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. एकीकडे विविध योजना राबवल्याने टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या कमी झाल्याचा दावा हा फसवाच असल्याचे टंचाईग्रस्त वाड्यांच्या आकड्यांवरून दिसून येत आहे.

हुंबरवणे, चिंचुर्टी गावात अखेर टॅंकर सुरू

लांजा - तालुक्‍यात पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. हुंबरवणे, चिंचुर्टी, पालू गावांमध्ये टंचाईची तीव्रता वाढली आहे. टॅंकरची मागणी करूनही प्रशासनाकडून पाणीपुरवठा करण्यासाठी चालढकलपणा सुरू होता. अखेर ग्रामस्थांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कळताच प्रशासनाने हुंबरवणे, चिंचुर्टी या दोन्ही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला.

उन्हाचा कहर आणि पाण्यासाठी करावी लागणारी वणवण यामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. चिंचुर्टी, हुंबरवणे, पालू या गावांत भीषण पाणीटंचाई आहे. येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टॅंकरची मागणी केली होती. गेले दोन आठवडे ग्रामस्थांनी केलेल्या पाण्याच्या मागणीला प्रशासनाने ठेंगा दाखवला. त्यामुळे येथील ग्रामस्थ नाराज झाले होते. अखेर पाण्यासाठी ग्रामस्थांनी हंडा-कळशी मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्यामुळे जाग आलेल्या प्रशासनाने  हुंबरवणे, चिंचुर्टी गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करणे सुरू केला. पालू गावानेही टॅंकरची मागणी केली आहे. येथे लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल.

Web Title: 63 village water shortage after rain