टेस्टिंग किटसंदर्भात मंत्री उदय सामंत यांची `ही` माहिती

65 Lakh Sanctioned For Testing Corona Kits Ratnagiri Marathi News
65 Lakh Sanctioned For Testing Corona Kits Ratnagiri Marathi News

रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेतील टेस्टिंग किटचा तुटवडा भासू देणार नाही. तीन दिवस पुरतील एवढी किट आहेत. ज्या एजन्सीकडून किट खरेदी केली होती. त्या एजन्सीचे थकीत पैसे तत्काळ देण्यासाठी 65 लाख जिल्हा नियोजनमधून मंजूर केले आहेत.

किट आणण्यासाठी एक ट्रक पुण्याला पाठवला आहे. दोन दिवसांत ते उपलब्ध होऊन तुटवड्याबाबतचा संभ्रम दूर होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही वाढले आहे.

नवीन टेस्टिंग किट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियेमध्ये अडकल्याची माहिती पुढे आली आहे. तीन दिवस पुरतील एवढीच किट जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. ज्या एजन्सीकडून किट घेतले होते, त्याचे 45 लाख रुपये देणे असल्याचे समजते.

त्याबाबत पालकमंत्री अनिल परब यांनीही लक्ष घातले आहे. जर टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, तर उसनवारीवर किट मागवावी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. किटचा तुटवडा भासत असल्याने 50 किटची मागणी केली आहे. त्यापैकी आता 30 किट आली आहेत. एका किटमध्ये साधारण 96 टेस्ट केल्या जातात. 

मी या विषयाची माहिती घेतली. जिल्हा रुग्णालयात तीन दिवस पुरतील एवढी टेस्टिंग किट आहेत. दरम्यान, पूर्वीच्या एजन्सीची थकीत रक्कम आणि आता नव्याने खरेदी करण्यासाठीची रक्कम म्हणून 65 लाख रुपये जिल्हा नियोजनमधून मंजूर केले आहेत. किट आणण्यासाठी एक ट्रक पाठविला आहे. दोन दिवसांत किट उपलब्ध होणार आहेत. 
- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com