esakal | लग्नाला नकार दिल्याचा डोक्यात राग ठेऊन मुलीच्या वडीलांचा त्याने केला खून
sakal

बोलून बातमी शोधा

 73 year old man stabbed  death in the head crime cases in ratnagiri district

मुलीच्या लग्नाला केलेल्या विरोधाचा राग धरून हत्या.

लग्नाला नकार दिल्याचा डोक्यात राग ठेऊन मुलीच्या वडीलांचा त्याने केला खून

sakal_logo
By
अमित पंडित

साखरपा (रत्नागिरी) : साखरपा इथे शुक्रवारी रात्री एका 73 वर्षीय व्रुद्धाचा डोक्यात जात्याचा दगड घालून खून करण्यात आला. मुलीशी लग्न लावून देण्यास विरोध केल्याने हा खून केला.

ह्या बाबत मूर्शी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

सुभाष काळोखे हे 73 वर्षीय व्रूद्ध आपल्या घरात एकटेच रहात होते. त्यांच्या मुलीशी आपले लग्न लावावे ह्यासाठी आरोपी अभिजित भिकू पाटील रहाणार नाचणे रोड रत्नागिरी हा तगादा लावत होता. सुभाष यांनी त्याच्या मागणीला नकार देत आपल्या मुलीचे लग्न अन्य ठिकाणी लावून दिले.

हेही वाचा- या गावात एकही विहीर नाही पण उन्हाळ्यातही वाहतात खळखळणाऱ्या पाण्याचे झरे -

2012 पासून आरोपी सुभाष काळोखे यांना त्रास देत होता. यात मयत काळोखे यांनी एकदा त्याच्या कानाखालीही मारली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी अभिजित याने सुभाष काळोखे यांच्या डोक्यात जात्याचा दगड घालून हत्या केली.

हेही वाचा- Independence  Day : लवकरच कोरोनावर मात करु ; ॲड. अनिल परब -

हत्येनंतर आरोपी अभिजित हा स्वतः रत्नागिरी पोलिसांच्या स्वाधीन झाला. ह्या खुनाची खबर मयत सुभाष यांचा मुलगा उदय काळोखे यांनी पोलिसांना दिली.ह्या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत.

संपादन - अर्चना बनगे

loading image