esakal | आयुष्यभर गोपालन करणार्‍या व्यंक्या लांबोरची एक्झिट चटका लावणारी
sakal

बोलून बातमी शोधा

80 years old wankya lambori dead in ratnagiri

व्यंक्या लांबोरने शिक्षणाची वाट सोडुन लहानपणापासुनच गुरे-ढोरांच्या सानिध्यात राहणे पसंद केले

आयुष्यभर गोपालन करणार्‍या व्यंक्या लांबोरची एक्झिट चटका लावणारी

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : गोपालनासाठी ब्रह्मचारी राहुन आयुष्यभर कष्टप्रद जीवन जगलेल्या कोंडगाव पुर्‍ये धनगरवाडीतील 87 वर्षाच्या व्यंक्या लांबोर याने रविवारी एक्झिट घेतली. व्यंक्या लांबोरचे जाणे सार्‍यांनाच चटका लावुन गेले आहे. धनगरवाडीत आई वडीलांच्या पश्चात एकाकी जीवन जगत, गुरे-ढोरे हेच कुटुंब मानणार आणि खडतर आयुष्य जगणारा व्यंक्या लांबोर लॉकडाउनच्या काळात एकटा पडला होता. 

हेही वाचा - चिपळूणात कोरोनाग्रस्तांचा एक हजाराचा टप्पा पार ; या वयोगटातील व्यक्तींचा अधिक समावेश...

घराची भींतही त्याच्यासारखीच ढासळली होती. जवळचे नातेवाईक त्याला आधार देत होते. मात्र वय झाल्याने त्याला धड उभेही राहता येत नव्हते. तरीही दोन गुरे त्याच्या शेजारीच दावणीला हजर होती. व्यंक्या लांबोरने शिक्षणाची वाट सोडुन लहानपणापासुनच गुरे-ढोरांच्या सानिध्यात राहणे पसंद केले. दुधाचा व्यापार करुन तो चांगला दुधउत्पादकही बनला होता. कोंडगाव दुग्ध सोसायटीने त्याचा अनेकवेळा सन्मानही केला होता. 

यावेळी देवरुखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, सकाळचे साडवली बातमीदार तसेच कर्णेश्वरचे पुजारी गजानन गुरव यांनी व्यंक्या लांबोरची वस्तुस्थिती जाणुन घेतली. आर्ते यांनी पंधरा दिवस पुरेल अशा जीवनावश्यक वस्तु लांबोर यांना दिल्या होत्या. दै.सकाळमधुन व्यंक्याची अवस्था समोर आल्यावर देवरुख शहर मनसे आणि साखरपा शहर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यंक्या लांबोरला मदत केली.

हेही वाचा - ग्रामस्थांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र...

वयाच्या ८० वर्षापर्यंत पाठीचा कणा वाकला तरी तो गायी गुरे चारायला नेत होता. सुमारे सहा कि.मी. पायी चालत जावून सोसायटीत दुधही घातले आहे. गेली सहा सात वर्ष तो अगदीच थकुन गेला आणि कोरोना काळात लॉकडाउन काळात तो सर्वसामान्यांसमोर आला. रविवारी सकाळी व्यंक्या लांबोर याने एक्झिट घेतली. आधी दोन दिवस पोटदुखीने तो त्रस्त झाला होता. त्यातच त्याने अखेरचा निरोप घेतला. गोपालनासाठी आयुष्य वेचलेल्या व्यंक्या लांबोरची एक्झिट सार्‍यांनाच चटका लावून गेली.

संपादन - स्नेहल कदम 

loading image