जिल्ह्यात हापूस आंब्याची 85 टक्के काढणी प्रक्रिया पूर्ण 

भूषण आरोसकर
शनिवार, 22 एप्रिल 2017

सावंतवाडी - जिल्ह्यात हापूस आंब्याची 85 ते 90 टक्के काढणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा हापूसवर ढगाळ वातावरण व उष्णतेचा परिणाम झाला. काढणी झालेला पुरेसा आंबा बाजारात विक्रीसाठीही आला; मात्र, आंब्याचे दर अद्यापही 250 च्या पुढेच आहेत. मे महिन्यात कमी दरातील हापूसची चव सर्वसामन्यांना चाखता येणार की नाही याबाबत सांशकता वाटत आहे. 

सावंतवाडी - जिल्ह्यात हापूस आंब्याची 85 ते 90 टक्के काढणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा हापूसवर ढगाळ वातावरण व उष्णतेचा परिणाम झाला. काढणी झालेला पुरेसा आंबा बाजारात विक्रीसाठीही आला; मात्र, आंब्याचे दर अद्यापही 250 च्या पुढेच आहेत. मे महिन्यात कमी दरातील हापूसची चव सर्वसामन्यांना चाखता येणार की नाही याबाबत सांशकता वाटत आहे. 

यंदा हापूसने पुरेशी फळधारणा बरी होती; मात्र दमट वातावरण वगळता उरलेल्या काढणी फळाला कोणताही धोका नसल्याचे फळसंशोधन केंद्राकडून सांगण्यात येत होते. जिल्ह्यात यंदा हापूसला वेळेत व पुरेसा मोहोर आला; मात्र हापूसला उष्णतेच्या झळा बसल्यामुळे आलेला हापूस आतून करपला गेला. यात फेब्रुवारीत फळधारणा झालेला हापूस काहीसा या उष्णतेपासून वाचला. बाजारात दीड महिन्यापूर्वीच हापूस दाखल झाला होता. त्यांनतर निर्माण झालेले ढगाळ वातावरणामुळे हापूसवर काळी छाया निर्माण होण्याचे संकेत मिळाले. त्याचा फटका थोड्याशा भागालाही जाणवला. तो पर्यत हापूस काढण्यायोग्य झाला असल्याने वाचला. या वेळी त्याला फळमाशी व करपाचा सामना करावा लागला. काही प्रमाणात उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे सुरवातीला असणारे हापूसचे दर प्रति डझन 250 रुपये राहिले होते. दर कमी होणार अशा काहीश्‍या अपेक्षात सर्वसामान्य राहिला होता. या हापूसची चव मात्र हवी तशी चाखता आली नसल्याचे चित्र आहे. पुढील दोन आठवड्यात हापूसची काढणी पूर्ण होणार असल्याचा अंदाजही फळ संशोधन केंद्राकडून वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास 15 मे नंतर हापूस बाजारपेठेत कमी प्रमाणात दिसणार आहे. त्यात दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्याच्या तोंडापासून हापूस अद्यापही दूरच राहीला आहे. कोकणात 1 लाख 82 हजार हेक्‍टर क्षेत्र हापूसखाली येते. त्यात 45 हजार हेक्‍टर क्षेत्रावर हापूस आंब्याचे चांगले उत्पादन येते. यंदा सुरवातीला दमट वातावणात चांगला फळधारणा ठरलेला हापूस चांगले उत्पादन देणार असल्याचा अंदाज होता. बाजारात हापूसचे दरही 250 रुपयाच्या खाली जात नाहीत. त्यात बाहेरून आलेले पर्यटक व खरेदीदार पैशाच्या उपलब्धतेनुसार आंब्याची खरेदी करत आहेत. त्यात सर्वसामान्य व ग्रामीण जनतेला मेमध्ये पुरेसा हापूस चाखायला मिळेल की नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थिती पाहता कोकणातील दापोली येथील काही भाग व सिंधुदुर्गात काहीसाच भागात हापूसची काढणी राहिली आहे. त्यातील जवळपास 15 टक्के भागच बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

उष्म्याचा तडाखा 
कोकणात एरव्ही 32 अंश ते 34 अंश पर्यंत तापमान असते, मात्र 36 अंश पर्यंत तापमानामुळे हापूस चांगलाच करपला. फळाच्या राजाचा बचाव होऊ शकला नाही. दमट ऐवजी उष्ण हवामान हापूसला उत्पादन कमी करण्यास साहाय ठरले. 

काजू हंगाम संपला 
यंदा काजू पिकाला जरी चांगले वातावरण मिळाले. मात्र काजू हमीभावाच्या अपेक्षावर पोचण्याची स्थिती झाली होती. जिल्ह्यात काजूला माकडांचा उपद्रवही त्रास देणारा ठरला. जिल्ह्यातील जवळपास 95 ते 97 टक्के काजूची काढणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: 85 percent of the hapoos mangoes in the district complete