लांजामध्ये एसटी अपघातात 9 जखमी; 2 गंभीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

लांजा- एसटीचा आणखी एक अपघात आज लांजात झाला. सायंकाळची लांजा-कोट ही प्रवाशांनी खचाखच भरलेली एस-टी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन गंभीर तर सात प्रवाशी जखमी झाले.सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा अपघात लांजा काजरघाटी-रत्नागिरी मार्गावर कुर्णे घडशीवाडी येथे घडला.यातील बहुतांशी प्रवाशांना किरकोळ दुखापतींवर निभावले आहे.

समोरून भरधाव वेगात आलेल्या ओमनी वाहनाला बाजू देताना एस टी रस्त्याच्या खाली उतरविल्याने हा अपघात झाला.गाडी साईडपट्टीवरून वेगात रस्त्याखाली उतरविल्याने झाडावर जाऊन आदळली. एम.एच.०७ सी ७२०९ हा अपघातग्रस्त एस टीचा नंबर असून ती लांजा डेपोची आहे.या गाडीचे चालक सर्जेराव मुंडे यांच्यासह लांजा हायस्कुलचा इयत्ता नववीतील विदयार्थी वरद नंदकुमार नेवाळकर (वय १४) हे दोघे गंभीर जखमी झाले.त्यांना पुढील उपचारांकरिता तातडीने रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. वरद हा कोट गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व राजू नेवाळकर यांचा मुलगा असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर रघुनाथ गोपाळ जोशी, उमेश बाळकृष्ण मेस्त्री, श्रीधर दामू कुंभार (सर्व रा.कोट) अक्षता कांबळे,सुरेश पड्ये (रा.कुर्णे)अर्चना गुरव, योगिता बोलये (रा.आगवे) हे सातजण जखमी झाले आहेत.

Web Title: 9 injured in accident Lanza ST; 2 serious

टॅग्स