डॉ. आंबेडकर म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठ - आठवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

महाड - चवदारतळे सत्याग्रह करून दलित, भटके, वंचित समूहांना माणुसकीचा हक्क व अधिकार मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठ होते, असे गौरवोद्‌गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे काढले. 

चवदारतळे सत्याग्रहाच्या 90 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी गुणगौरव समारंभ घेण्यात आला. या समारंभात आठवले बोलत होते. या वेळी "क्रांतिभूमी' या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थी बहुजन परिषदेतर्फे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2017 ने सन्मानित करण्यात आले. 

विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा त्वरित उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही आठवले यांनी दिली. महाविद्यालयाच्या प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान भवनाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकार स्तरावर आपण लक्ष घालू, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गुरव यांनी केले. या वेळी महाविद्यालयाचे स्थानिक समितीचे सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. सुप्रिया शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: 90th Anniversary chavdar tale satyagrah