आंबोलीत पर्यटकांचा ओघ कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

आंबोली - गटारी अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर आज येथील मुख्य धबधब्यावर गर्दी कमी होती. गेल्या रविवार (ता. १६)पेक्षा गर्दीचे प्रमाण कमी दिसून आले. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

येथील वर्षा पर्यटनाला दर रविवारी गर्दी होते; मात्र आज गर्दीचे प्रमाण कमी होते. आज महिला विश्वचशक क्रिकेटचा सामना होता. सामना पाहण्यासाठी क्रीडा प्रेमींनी घरी राहणेच पसंत केले. त्यामुळे गर्दीचे घटले असावे, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

तसेच कोल्हापूर आरटीओनी ओव्हरलोड प्रवासी वाहतुकीला घातलेला लगाम, आजरा व चंदगड येथून पोलिसांनी कडक चेकिंग करून गाड्या सोडल्याचा परिणामही पर्यटनावर दिसून आला.

अमवास्या व श्रावण सोमवारच्या आधी गर्दी होण्याची शक्‍यता पोलिसांनी लक्षात घेऊन पर्यटनस्थळांवर नियोजन केले होते. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, निरिक्षक सुनील धनावडे यांच्यासह १६ अधिकारी, १३० पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड बंदोबस्तासाठी आज याठिकाणी होते.
चौथा शनिवार असल्याने शुक्रवारपासूनच सर्व हॉटेल्स हाऊसफुल होती; आज गेल्या राविवारपेक्षा गर्दी कमी होती. पोलिसांच्या चोख नियोजनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करणाऱ्या ४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली, अशी माहिती पोलीस गुरुदास तेली यांनी दिली.

Web Title: aamboli konkan enws tourist decrease in aamboli