आमटे कुटुंबीयांचे कार्य देशाला भूषणावह - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

वेंगुर्ले - चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात सुरू असलेल्या आमटे कुटुंबीयांच्या आनंदवनचे कार्य देशाला भूषणावह आहे. आनंदवनचे कार्य व त्यासाठी आवश्‍यक ते सर्व सहकार्य शासनस्तवरावरून करणार असल्याचे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे स्वरानंदवन कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले. 

पुष्कराज कोले मित्रमंडळतर्फे डॉ. विकास आमटे निर्मित अंध-अपंग, मूकबधीर, कुष्ठरोगमुक्त, निराधार अशा दिव्यांगांच्या दिव्य प्रतिभेचा आविष्कार स्वरानंदवन या स्वर, ताल, नृत्य कार्यक्रमाचे आयोजन साई दरबार सभागृहात केले होते. या वेळी श्री. केसरकर बोलत होते.

व्यासपीठावर उद्योजक पुष्कराज कोले, अपर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, स्वरानंदवनचे निर्माते डॉ. विकास आमटे, संयोजक सदाशिव ताजने, नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार अमोल पोवार, नायब तहसीलदार प्रियांका लोखंडे, उद्योजक दादासाहेब परुळेकर, प्रकाश परब आदी उपस्थित होते. स्वरानंदवन कार्यक्रमाच्या मध्यांतरात वेंगुर्ले तालुक्‍यातील विविध क्षेत्रांत गेली २५ ते ३० वर्षे नि:स्पृह सेवा करणारे मान्यवरांचा सेवाव्रती पुरस्काराने डॉ. विकास आमटे व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये प. म. राऊत (शिक्षणमहर्षी), डॉ. विवेक रेडकर (वैद्यकीय), मीराताई जाधव (सामाजिक), कमलाकांत प्रभू (महिला दशावतार कला), अमृत पाटील (कुस्ती प्रसारक), रेखाताई गायकवाड (मतिमंदांसाठी कार्य), डॉ. वसुधा मोरे (योगशिक्षक), प्रज्ञा परब (काथ्या उद्योग), सिद्धार्थ झांटये (काजू उद्योजक), मेघ:श्‍याम उर्फ सुनील मराठे (मुद्रक/प्रकाशक), दादा हळदणकर (नाट्य दिग्दर्शक), सुहासिनी वैद्य (शेतीविषयक कार्य) यांचा समावेश होता. 

या सेवाव्रतींच्या कोंदणात भारतातील अग्रगण्य सामाजिक संस्था, महारोगी सेवा समिती, कुष्ठरोगी, निराधार, अपंग, कर्णबधीर, मतिमंद, मूकबंधिरांसाठी कार्य करणारे स्वरानंदनवनचे निर्माता, दिग्दर्शक, प्रणेते डॉ. विकास आमटे यांचा त्यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल दिव्यत्वाची जेथे प्रचिती या सन्मानपत्राने सिंधुदुर्गवासीयांच्या वतीने पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योजक पुष्कराज कोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मानपत्राचे वाचन राजेश घाटवळ यांनी केले. या वेळी पुष्कराज कोले यांनी आनंदवन संस्थेस १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश, पालकमंत्री केसरकर यांनी १ लाखाचा धनादेश, जिंदाल उद्योग समूहातील उपस्थित मान्यवरांनी ५५ हजार रुपयांचा धनादेश, श्रावणी बुवा या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसानिमित्त साठविलेले ५ हजार रुपये आदी आर्थिक मदत डॉ. विकास आमटे यांच्याकडे सुपूर्द केली. तर सिंधुदुर्गातील वृद्ध, निराधार लोकांसाठी कार्यरत असलेल्या आनंदाश्रय संस्थेला १ लाखाचा धनादेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आनंदाश्रयचे काका परब यांच्याकडे सुपूर्द केला. विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि आनंदाश्रय या दोन संस्थांसाठी यापुढे आपण नेहमीच मदत करीत राहणार असल्याचे प्रतिपादन या वेळी उद्योजक पुष्कराज कोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक नवार, दादा रेडकर, सिद्धेश कोले, सिद्धेश नाईक, योगेश गावडे, रामदास हुले, नेहा राणे, नारायण राणे, प्रकाश परब, संतोष मुणनकर, सत्यवान सुर्वे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: aamte family work for country