आमदार उदय सामंत यांनी स्वीकारला एबी फॉर्म 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनी मंगळवारी  शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे, सेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म घेतला. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमदार सामंत यांना शुभेच्छा दिल्या. यंदाही विधानसभेवर सेनेचा झेंडा फडकणार, अशी ग्वाही सामंत यांनी ठाकरे यांना दिली.

चौथ्या इनिंगसाठी आमदार उदय सामंत यांनी जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी मुंबई येथे सेनाप्रमुखांच्या उपस्थित त्यांनी पक्षाचा एबी फॉंर्म घेतला. इतकेच नव्ह; तर यावेळी सामंत विजयी होणार ही बाब निर्विवाद असल्याचा विश्‍वास सेना प्रमुखांनी व्यक्त केला. त्यामुळे सलग चौथ्यांदा विजयी होण्याचे रेकॉंर्ड उदय सामंत रत्नागिरीतून करणार हे निश्‍चित झाले आहे. 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमदार सामंत यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी सेनेचे उपनेते आमदार उदय सामंत, शिवसेना सचिव अनिल देसाई आणि सूरज चव्हाण यांच्यात निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा देखील झाली. सेनेचे उपनेते पद बजावताना इतर सेनेचे उमेदवार जास्तीत जास्त कसे विजयी होतील, या सर्व विषयावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत आमदार सामंत यांनी महत्वपूर्ण भूमिकेने आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून दिली. यंदा विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्‍य घेतील, असा विश्‍वास सेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

चार ऑक्‍टोबर होणार आगळी सभा 

येत्या शुक्रवारी (ता. 4) येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर आमदार सामंत यांची भव्य सभा होणार आहे. यानंतर ते उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. यंदा ही सभा लक्षवेधी ठरणार असून याचे नियोजन वैशिष्टपूर्ण करण्यात येणार आल्याची चर्चा आता सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AB form adopted by MLA Uday Samant