
"मी मूळचा कॉंग्रेसवालाच. शिवसेनेत असलेली पाय खेचण्याची प्रवृत्ती तसेच काम करणाऱ्याला कोणताही सन्मान मिळत नाही.
कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पुन्हा घरवापशी केल्याचे अभय शिरसाट यांनी सांगितले. कुडाळमध्ये कॉंग्रेसची ताकद आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीत जर महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी विचार सहानुभूती केला नाही तर आम्ही कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू, असे शिरसाट यांनी येथे झालेल्या स्वागतावेळी सांगितले.
शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करून कॉंग्रेस स्वगृही झालेले शिरसाट यांचे स्वागत शहरातील गांधी चौक येथे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. तालुकाध्यक्ष आबा मुंज, अरविंद मोंडकर, प्रकाश जैतापकर, मंदार शिरसाट, प्रसाद बांदेकर, बकत्तावर मुजावर, अरविंद शिरसाट, उल्हास शिरसाट, चिन्मय बांदेकर, घावनाळे उपसरपंच वारंग, निता राणे, बाळू अंधारी, किशोर काणेकर, विजय प्रभू, व्हि. डी. जाधव, आत्माराम जाधव, ऍड. दिलीप नार्वेकर, सदासेन सावंत, प्रसाद धडाम आदी उपस्थित होते.
हेही वाचा- मृत्यूदरात रत्नागिरी जिल्हा पहिल्या पाचात; नवीन 19 रुग्ण सापडले
पाय खेचण्याची प्रवृत्ती
शिरसाट म्हणाले, "मी मूळचा कॉंग्रेसवालाच. शिवसेनेत असलेली पाय खेचण्याची प्रवृत्ती तसेच काम करणाऱ्याला कोणताही सन्मान मिळत नाही. त्यामुळे पुन्हा कॉंग्रेसवासीय झालो. आता कुडाळ शहरासह ग्रामीण भागात कॉंग्रेस पक्ष जोमाने वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू.
हेही वाचा-पोलिसांचा घेतला चावा अन् ठोकली धुम; दोन पोलिस जखमी
आता तडजोड नाही
शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्राचा फॉर्मुला आहे तो कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत चालणार नाही. कारण या ठिकाणी कॉंग्रेसची ताकद आहे. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त जागा आम्ही मागणार आहोत. जर यामध्ये कोणतीही तडजोड झाली नाही तर कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता स्थापन करेल.''
संपादन - अर्चना बनगे