Dapoli : नीट परिक्षेत अभिजीतची बाजी ; दापोलीत कौतुक सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीट परिक्षेत अभिजीतची बाजी ; दापोलीत कौतुक सोहळा

नीट परिक्षेत अभिजीतची बाजी ; दापोलीत कौतुक सोहळा

हर्णे : एम. बी.बी.एसच्या शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी नीट परिक्षा २०२१ मध्ये कु.अभिजित उत्तम पाटील याने ६३५ गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे. एवढे गुण मिळवून अभिजीत तालुक्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

अभिजित हा दापोलीतील नामवंत ज्ञानदीप विद्यामंदिर हायस्कुलचा आदर्श विद्यार्थी होता. त्याचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण या शाळेतच झालेलं असून तेथील शिक्षकांनी त्याची अष्टपैलू म्हणून जडणघडण केली. वक्तृत्व, स्पर्धा परीक्षा, बुद्धिमत्ता चाचणी, विज्ञान प्रदर्शन शाळेचे विविध सामाजिक उपक्रम यामध्ये त्याचा प्रामुख्याने सहभाग असायचा. महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान त्याने मिळवला होता.

दहावीनंतर तो संजय घोडवत कनिष्ठ महाविद्यालय कोल्हापूर येथे त्याने सायन्स शाखेमधून ११वी व १२वी चे दोन वर्षाचे शिक्षण घेतले. तिथेही तो विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाला आहे . नीट परीक्षेतील यशाकरिता ज्ञानदीप विद्यामंदिरचे मुख्याध्यापक महेश शिंदे व चंदाली पारकर यांनी यथोचित सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. घोडवत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख गुप्तां व इतर शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले. त्याला नीट परीक्षेतील गुणामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. अभिजित हा वराडकर बेलोसे महविद्यालयातील मराठी विषय विभाग प्रमुख प्राध्यापक श्री. उत्तम पाटील यांचा मुलगा आहे त्यामुळे वडिलांचेदेखील चांगलेच सहकार्य लाभले आहे. त्यामुळे दापोलीमधून अभिजीतचे शिक्षकवृंदाकडून कौतुकच होत आहे.

loading image
go to top