रत्नागिरी : दापोलीत सुमारे दोन हजार ग्रॅम गांजा जप्त

About 2,000 grams of Ganja seized from this car in Dapoli
About 2,000 grams of Ganja seized from this car in Dapoli

दाभोळ - दापोली पोलिसांनी कोकंबा आळी परिसरात एका मोटारीतून गांजा जप्त केला. सुमारे 14 हजार रुपये किमतीचा 1966.5  ग्रॅम गांजा यावेळी मोटारीतून पोलिसांनी जप्त केला. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई केली. कारवाईमध्ये एकूण सुमारे 2100. 5 ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी दोन संशयितांना अटक झाली आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे.

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, किसन लक्ष्मण कदम ( 65, ,राहणार बेलवाडी पालगड) व रिहाना जमीर काझी ( 43 राहणार कोकंबा आळी, दापोली).

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना कोकंबा आळी परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मोहन पाटील व दापोली पोलिसांच्या पथकाने काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंचांसमक्ष मोटारीवर धाड टाकली. एमएच 08 आर 4980 या मोटारीतून 14 हजार रुपये किमतीचा 1,966.5  ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. एका छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यात अमली पदार्थ सदृश्य गांजा या मोटारीच्या डिक्कीत मिळाला.

 संशयित किसन लक्ष्मण कदम यांचेकडे एक हजार रुपये किमतीचा सहा छोट्या पिशव्यांमध्ये ठेवलेला 135 ग्रॅम गांजा, 2 चिलमी, 1 लायटर आढळून आला. दापोली पोलिसांनी असा एकूण 2100. 5 ग्रॅम गांजा तसेच 1 लाख 75 हजार रुपये किमतीची मोटार जप्त केली आहे. 

याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरोधात दापोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com