‘मला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर’

‘बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक’ अशी त्यांची ओळख आहे.
Ramdas Kadam
Ramdas Kadamsakal media

चिपळूण : ‘‘महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून ज्यांना मंत्रिपदे मिळाली ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. शिवसेनेतील काही मंत्री मला बाजूला करत आहेत,’’ अशी भावना शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली.

या पार्श्‍वभूमीवर आमदार कदम यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला असता मला आता याविषयी काहीच बोलायचे नाही, असे ते म्हणाले. ठाकरे यांच्यासोबत खास राजकीय संबंध असलेल्या नेत्यांमध्ये कदम हे नाव महत्त्वाचे होते. ‘बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक’ अशी त्यांची ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून खास करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून कदम हे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावले.

पत्रात मंत्र्यांची नावे

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या सहा पानी पत्रात रामदास कदम यांनी शिवसेनेच्या गोटातून मंत्री झालेलेच आपल्याला संपवण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे. काही मंत्र्यांच्या नावांचादेखील पत्रात उल्लेख आहे. निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले जात असल्यामुळे मी नाराज आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावाही त्यांनी पत्रात केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com