ट्रेक क्षितिज संस्थेची शैक्षणिक मदत 

अमित गवळे 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील श्री सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळ, पाच्छापुर माध्यमिक विदयालयातील दहावीच्या विदयार्थ्यांना नुकतेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. डोंबविली  येथीाल ट्रेक क्षितिज संस्थेंच्यावतीने ही मदत करण्यात आली. मागील बारा वर्षांपासून ट्रेक क्षितिज संस्थेच्यावतीने या विदयालयास विविध प्रकारची शैक्षणिक व भौतिक साहित्याची मदत केली जात आहे.

ट्रेक क्षितिज संस्थेचे अध्यक्ष राहुल मेश्राम तसेच प्राची राऊत यांच्यावतीने दहावीच्या ३५ विदयार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ट्रेक क्षितिज संस्थेच्या वतीने सन २००६ पासून या विदयालयास विवीध प्रकारची शैक्षणिक व भौतिक साहित्याची मदत केली जात आहे. संस्थेच्या प्राची राउत यांनी शाळेला २०१५ मध्ये २१ हजार रुपयांचे फर्निचर देणगी दिले. तसेच २०१७ मध्ये इयत्ता ९ वीच्या विदयार्थ्यांना ३० पाठ्यपुस्तकांचा संच दिला.

पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमास श्री सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एकनाथ चांदे, शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दिपक उत्तम माळी, ग्रामस्थ व गिर्यारोहक रामचंद्र (बच्चू) भूस्कुटे, राजिप शाळा मुख्याध्यापिका रानडे मॅडम, वसंत जंगम, राजाराम वाघमारे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.

Web Title: academic help from Trek Kshitij organization