वैभववाडी : नगराध्यक्षपदासाठीच्या हालचालींना वेग

चार नगरपंचायती; नगरसेवक स्थिर ठेवण्यासाठी पक्षांकडून गट स्थापन, उद्या चित्र अधिक स्पष्ट
Election
Electionsakal

वैभववाडी : ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिला, पुरुष की इतर प्रवर्ग पडणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. काठावर बहुमत असलेल्या नगरपंचायतीत राजकीय घडामोंडीना वेग आला असून, आपापले नगरसेवक स्थिर राहावे, यासाठी राजकीय पक्षांकडून गट स्थापन करण्यात येत आहेत.

Election
UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!

जिल्ह्यातील वाभवे- वैभववाडी, कसई- दोडामार्ग, कुडाळ आणि देवगड- जामसंडे या चार नगरपंचायतींची निवडणुक ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयामुळे २१ डिसेंबर २०२१ आणि १८ जानेवारी २०२२ ला झाली. या निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारीला झाली. निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला. वाभवे वैभववाडी आणि कसई दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळविले. देवगड-जामसंडेमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीने नऊ जागा मिळवित भाजपला धोबीपछाड दिले. कुडाळमध्ये त्रिशंकु स्थिती निर्माण झाली असून, नगराध्यक्षपदाच्या चाव्या काँग्रेसकडे आहेत.

येत्या २७ ला मुंबईत नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत होणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्ह्यातील चारही नगररपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे या चार नगरपंचायतीचे आरक्षण महिला, पुरूष कि इतर काही पडणार याकडे आता नगराध्यक्षपदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीला काठावरचे बहुमत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडुन खबरदारी घेत नऊसदस्यीय गटाची नोंदणी केली आहे. येथे भाजपला सत्ता काबीज करण्यासाठी एका सदस्यांची गरज आहे. त्यामुळे राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

Election
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांचा 'पद्मभूषण' स्विकारण्यास नकार

कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपाकडे आठ, शिवसेनेकडे सात आणि काँगेसकडे दोन सदस्य आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा करायचा यासाठी काँग्रेसची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी जिल्ह्यात काँग्रेसने स्वबळावर जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे येथे अनिश्चितेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या सदस्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी अनेकांचे गुप्तगू सुरू आहे.

दोडामार्गमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे; परंतु भाजपतर्गंत दोन गट निर्माण झाले असुन ते एकमेकाविरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. त्यातच आमदार दीपक केसरकर यांनी चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, अशी टिप्पणी केल्यामुळे दोडामार्गात नेमके काय घडणार याची उत्सुकता लागली आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीमध्ये नऊ सदस्य पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. याशिवाय एक सदस्य पक्षपुरस्कृत उमेदवार निवडुन आला आहे. या दहा सदस्यांचा गट केला आहे. त्यामुळे येथे भाजपचा नगराध्यक्षच होणार आहे.

मुंबईत होणार आरक्षण सोडत

राज्यभरात झालेल्या नगरपंचायतीची आरक्षण सोडत २७ जानेवारीला मुंबईत होणार आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्याने नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण असणार नाही. त्यामुळे आता महिला, पुरुष आणि इतर प्रवर्गांसाठीच आरक्षण सोडत होणार आहे.

आरक्षण निश्चितीनंतर पक्षांतर्गत धुसफूस शक्य

निवडून आलेल्या अनेकांमध्ये नगराध्यक्षपदाची सुप्त इच्छा आहे. परंतु, सध्या कुणीही थेट बोलताना दिसत नाही. मात्र, आरक्षण निश्चित झाल्यावर पक्षांतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदावरून टोकाचे वाद होण्याचीही शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com